Mumbai : स्वयंचलित दरवाजांची विना-एसी लोकल दाखल; लवकरच नव्या सुरक्षा चाचण्या

मध्य रेल्वेच्या उपनगरीय नेटवर्कवरील प्रवाशांच्या सुरक्षेत मोठी सुधारणा करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. स्वयंचलित दरवाजांनी सज्ज असलेल्या विना-एसी लोकल ट्रेनचा सुधारित प्रोटोकॉल (प्रारूप) मुंबईत दाखल झाला आहे.
Mumbai : स्वयंचलित दरवाजांची विना-एसी लोकल दाखल; लवकरच नव्या सुरक्षा चाचण्या
Mumbai : स्वयंचलित दरवाजांची विना-एसी लोकल दाखल; लवकरच नव्या सुरक्षा चाचण्या
Published on: 

अभिषेक पाठक/मुंबई

मध्य रेल्वेच्या उपनगरीय नेटवर्कवरील प्रवाशांच्या सुरक्षेत मोठी सुधारणा करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. स्वयंचलित दरवाजांनी सज्ज असलेल्या विना-एसी लोकल ट्रेनचा सुधारित प्रोटोकॉल (प्रारूप) मुंबईत दाखल झाला आहे. चेन्नई येथील 'इंटेग्रल कोच फॅक्टरी' (आयसीएफ) मध्ये तयार करण्यात आलेला हा रेक तांत्रिक बदलांनंतर मुंबईत आणण्यात आला आहे. प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यापूर्वी आता या लोकलच्या विविध नव्या चाचण्या घेतल्या जातील. दरम्यान, कुर्ला कारशेडमध्ये उभ्या असलेल्या पहिल्या प्रोटोटाइप रेकमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी तोदेखील चेन्नईला पाठवला जाणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

ऑगस्ट महिन्यात पहिल्या प्रोटोटाइपच्या प्राथमिक चाचण्यांदरम्यान काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्या होत्या. अनुसंधान, अभिकल्प आणि मानक संघटनाद्वारे (आरडीएसओ) चाचणीदरम्यान काही मुद्दे उपस्थित केल्यानंतर सुधारित रेक पुन्हा आयसीएफकडे पाठवण्यात आला होता. उत्तर प्रदेश-मध्य प्रदेश सीमेवरील झाशी विभागांतर्गत ६३.२७ किमी लांबीच्या खजुराहो-महोबा विभागातील रेकच्या सुरुवातीच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. मुंबईत स्वयंचलित दरवाजे असलेल्या उपनगरीय गाड्या सुरू करण्याच्या योजनेचा भाग म्हणून आयसीएफमध्ये दोन विना-एसी प्रोटोटाइप रेक विकसित करण्यात आले आहेत. जून २०२५ मध्ये दिवा आणि मुंब्रा दरम्यान झालेल्या ट्रेन दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या उपक्रमाची घोषणा केली होती.

विविध सुरक्षा चाचण्या होणार

सुधारित रेकला प्रवाशांच्या सेवेसाठी सुरक्षा चाचण्यांमधून जावे लागेल. यातील एक प्रमुख चाचणी म्हणजे 'कन्फर्मेटरी ऑसिलेटर कार रन', ज्यामध्ये वेगवेगळ्या वेगांमध्ये होणारी कंपने, डब्यांची हालचाल, धावण्याची स्थिरता आणि प्रवाशांचा आराम यांचा अभ्यास केला जातो. याशिवाय चाके आणि रुळांमधील घर्षण व संवादाचाही अभ्यास केला जाईल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)