Mumbai : गेमचा आयडी वापरला म्हणून चाकूहल्ला; तरुण गंभीर जखमी

ऑनलाइन गेमच्या आयडीवरून (आयडी) झालेला वाद विकोपाला जाऊन एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना सांताक्रूझ (पूर्व) येथील कलिना परिसरात घडली आहे.
Mumbai : गेमचा आयडी वापरला म्हणून चाकूहल्ला; तरुण गंभीर जखमी
Mumbai : गेमचा आयडी वापरला म्हणून चाकूहल्ला; तरुण गंभीर जखमीप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

मेघा कुचिक/मुंबई

ऑनलाइन गेमच्या आयडीवरून (आयडी) झालेला वाद विकोपाला जाऊन एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना सांताक्रूझ (पूर्व) येथील कलिना परिसरात घडली आहे. या हल्ल्यात दिलशाद शाह नावाचा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या मानेवर गंभीर वार करण्यात आले आहेत. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून तो सुदैवाने वाचला आहे.

ही घटना ३० सप्टेंबरला पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. सलमान फारुक शाह याने दिलेल्या तक्रारीनुसार, तो आणि त्याचा भाऊ दिलशाद हे मोहंमद सोहेल इशारत अली शाह, समीर कमाल शाह, अस्लम शमसुद्दीन शाह आणि रवी प्रमोदकुमार साकेत या मित्रांसोबत कुंची कुर्वेनगर येथील सेंट रॉक चर्चच्या पायऱ्यांवर बसले होते. त्यानंतर सलमान कुर्ला (पश्चिम) येथील किस्मत नगरमधील आपल्या घरी जेवणासाठी निघून गेला.

सलमानने दिलेल्या माहितीनुसार, तो घरी असताना त्याच्या गावातील ओळखीच्या अरबाज शाह याने त्याला फोन करून गेम आयडीच्या मुद्द्यावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा वाद मिटावा यासाठी सलमानने आधीच दिलशादचा फोन नंबर अरबाजला दिला होता. काही वेळाने सलमानने दिलशादला फोन करून हल्ल्याची माहिती दिली. आपला आणि आपल्या भावाचा फेसबुक आयडी वापरून हे दोघे ऑनलाइन गेम खेळत असल्याचा संशय अरबाजला होता, याच रागातून त्याने दिलशादवर हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in