Mumbai : ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रारदाराशी गैरवर्तन महागात; २ पोलिस अधिकारी निलंबित

संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना सात दिवसांच्या आत स्वस्पष्टीकरण अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. योग्य कायदेशीर प्रक्रिया न पाळता पोलिस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
Mumbai : ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रारदाराशी गैरवर्तन महागात; २ पोलिस अधिकारी निलंबित
Mumbai : ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रारदाराशी गैरवर्तन महागात; २ पोलिस अधिकारी निलंबित Instagram: (@growwithritesh)
Published on

मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रारदारांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपानंतर दोन सहाय्यक पोलिस निरीक्षकांना निलंबित करण्यात आलं आहे. तसेच पाच पोलिसांविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. विभागीय पोलिस उपायुक्त (क्षेत्र ९) दीक्षित गेडाम यांनी ही कारवाई केली आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना सात दिवसांच्या आत स्वस्पष्टीकरण अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. योग्य कायदेशीर प्रक्रिया न पाळता पोलिस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

घटना काय?

ही घटना ४ नोव्हेंबरच्या संध्याकाळी घडली. त्यावेळी एका राजकीय पक्षाचे १० ते १५ कार्यकर्ते ओशिवरा पोलिस ठाण्यात आले होते. जोगेश्वरी (पश्चिम) येथील गुप्ता किराणा दुकानाजवळ एका कुटुंबावर दुसऱ्या कुटुंबाने हल्ला केल्याची तक्रार देण्यासाठी ते आले होते. त्याच वेळी, एका अल्पवयीन मुलीसह तिची आईही एका युवकाकडून छेडछाडीच्या तक्रारीसाठी पोलिस ठाण्यात आली होती.

यावेळी कार्यकर्त्यांनी तत्काळ कारवाईची मागणी केली. पोलिस अधिकाऱ्यांनी योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असं सांगितलं. मात्र परिस्थिती तणावपूर्ण झाली आणि काही पोलिसांवर गैरवर्तनाचे आरोप झाले. योग्य कायदेशीर प्रक्रिया न पाळता त्यांनी कार्यकर्त्यांशी उद्धट वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश ७ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश केंगार आणि गणेश गायके, पोलिस उपनिरीक्षक बाबू तोत्रे आणि दीपक बर्वे, तसेच पोलिस शिपाई अजिम झारी यांच्याविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in