मुंबई-पणजी-मुंबई वातानुकूलित शिवशाही बस सुसाट

मुंबई-कोकण मार्गावरील अन्य गाड्यांच्या तुलनेत या गाडीचे भाडे कमी असल्याने प्रवाशांची शिवशाहीला सर्वाधिक पसंती
मुंबई-पणजी-मुंबई वातानुकूलित शिवशाही बस सुसाट
Published on

दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्यने प्रवासी नाताळासाठी सुट्टीला गोव्याला जात आहेत. याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या मुंबई विभागामार्फत मुंबई सेंट्रल ते पणजी अशी वातानुकूलित शिवशाही बस सेवा २३ डिसेंबर रोजी सुरु करण्यात आली. या मुंबई-पणजी-मुंबई वातानुकूलित शिवशाही गाडीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मुंबई-कोकण मार्गावरील अन्य गाड्यांच्या तुलनेत या गाडीचे भाडे कमी असल्याने प्रवाशांची शिवशाहीला सर्वाधिक पसंती मिळत आहे.

४८ आसनक्षमता असलेल्या या गाडीचा तिकीटदर १,२४५ रुपये आहे. पणजी-मुंबई या परतीच्या प्रवासाचे सुरुवातीचे दोन दिवस पूर्ण आरक्षणानंतर नववर्षाच्या पहिल्याच दिवसाचे आरक्षण पूर्ण झाले आहे. २ जानेवारीसाठी गाडीचे निम्मे आरक्षण झाले असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मुंबई-पणजी आणि पणजी-मुंबई या शिवशाहीतून प्रवास केलेल्या प्रवाशांनी गाडीचा दर्जा आणि सेवेबाबत समाधान व्यक्त केले असून २ जानेवारीपर्यंत सुरु ठेवण्यात येणाऱ्या या सेवेला कायम ठेवायचे की मुदतीनंतर थांबवायचे याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in