मुंबईतही आता पेटकेअर शिक्षण व प्रशिक्षण संस्था; प्राणीप्रेमींना गुगल फॉर्मद्वारे सूचना व हरकती नोंदवा

पुण्यात नुकतीच पेटकेअर एज्युकेशन अँड ट्रेनिंग संस्थेची सुरुवात करण्यात आली असून, याच धर्तीवर मुंबईतही पेटकेअर शिक्षण व प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येणार आहे.
मुंबईतही आता पेटकेअर शिक्षण व प्रशिक्षण संस्था; प्राणीप्रेमींना गुगल फॉर्मद्वारे सूचना व हरकती नोंदवा
मुंबईतही आता पेटकेअर शिक्षण व प्रशिक्षण संस्था; प्राणीप्रेमींना गुगल फॉर्मद्वारे सूचना व हरकती नोंदवा 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : पुण्यात नुकतीच पेटकेअर एज्युकेशन अँड ट्रेनिंग संस्थेची सुरुवात करण्यात आली असून, याच धर्तीवर मुंबईतही पेटकेअर शिक्षण व प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पाळीव प्राण्यांची काळजी, आरोग्य, सुरक्षितता आणि कल्याण यांना प्राधान्य देत आधुनिक, शास्त्रीय आणि नैतिक पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या क्षेत्रात करीअर करू इच्छिणाऱ्यांना विविध मान्यताप्राप्त प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

हरकती, सूचनांसाठी लिंक

मुंबईत पेटकेअर शिक्षण व प्रशिक्षण संस्था सुरू करण्याच्या दृष्टीने प्राणीप्रेमी आणि नागरिकांकडून सूचना व हरकती मागवण्यात येत आहेत. यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यांवर गुगल फॉर्मची लिंक (https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfZsMPGIodkUXWu5Su2DRtFEVnyWb2SjFepoxkOqUcfdSe97g/viewform) उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी खालील लिंकवर जाऊन आपली मते, सूचना व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले आहे.

पेट हँडलिंग, डॉग वॉकिंगचा समावेश

या प्रशिक्षणामध्ये पेट हँडलिंग, डॉग वॉकिंग, पेट सिटिंग, पेट ग्रूमिंग आणि पाळीव प्राण्यांसाठी निवास व देखभाल सुविधा व्यवस्थापन अशा विविध विषयांचा समावेश असेल. प्रात्यक्षिक प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात येणार असून, आधुनिक सुविधांमध्ये प्रत्यक्ष अनुभवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्ये आत्मसात करता येतील. तसेच, पाळीव प्राण्यांचे आरोग्य, संगोपन आणि कल्याण याविषयी माहिती देणारे ऑनलाइन अभ्यासक्रमही पेट पॅरेंट्ससाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे, असे ही ते म्हणाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in