
मुंबई : मुंबईत उच्च न्यायालयाने कबुतरखाने बंद ठेवण्याचे आदेश कायम ठेवले आहे. तरी काही कबुतरप्रेमी दादर परिसरात न्यायालताचे आदेश धुडकावून कारच्या छतावर कबुतरांना दाणे ठेवताना निदर्शनास आले. त्यांनतर दादर कबुतरखाना परिसरात दंगल नियंत्रण पथक तैनात ठेवण्यात आले.
मुंबईमध्ये कबुतरांच्या विष्टेमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे लोकांकडे फुप्फुस प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगत उच्च न्यायालयाने सांगितले होते.
मात्र यानंतरही काही कबुतरप्रेमी जाणूनबुजून कबुतरांना दाणे घालताना दिसत आहेत. लालबाग येथील एका कबुतरप्रेमींनी शनिवारी सकाळी गाडीच्या छतावर कबुतरांना मोठ्या ताटामध्ये दाणे ठेवले होते. त्या ताटावर पांढरट, राखाडी, तपकिरी रंगाच्या कबुतरांनी ताव मारल्याचे दिसून आले. यादरम्यान, स्थानिकांनी त्यांना विरोध केला असता, लालबाग येथील गृहस्थ स्थानिकांची हुज्जत घालताना
निदर्शनास आले. दरम्यान, कबुतरखाना परिसरातील परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात आल्यानंतर या ठिकाणी महापालिकेच्या दंगल नियंत्रण ठेवण्यात आले. कर्मचाऱ्यांसह पथक तैनात
कबुतरांना खाद्य देणारे काही जण बंदी टाळण्यासाठी आता नवे मार्ग शोधत आहेत. कधी गाडीच्या छतावर, कधी इमारतीच्या टेरेसवर, तर कधी गुपचूप गल्लीच्या कोपऱ्यात दाणे टाकून जातात. पण त्यांच्या या कृतीमुळे फक्त उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होत असून शहरातील आरोग्यावर आणि स्वच्छतेवरही मोठा धोका निर्माण होत आहे.
मयुर आगाशे, स्थानिक