मुंबईत 'पॉड टॅक्सी' चालवण्याचा निर्णय; 'या' परिसरातून धावणार, कोणती स्थानके जोडणार? १०३८ कोटींचा खर्च
(प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबईत 'पॉड टॅक्सी' चालवण्याचा निर्णय; 'या' परिसरातून धावणार, कोणती स्थानके जोडणार? १०३८ कोटींचा खर्च

‘द पॉड टॅक्सी’ तासाला ४० किमी वेगाने धावणार आहे. यातून प्रवाशांना सहजपणे व आरामदायी प्रवास करणे शक्य होईल.

रुचा कानोलकर/मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल भाग हा मुंबईतील अत्यंत व्यस्त भाग आहे. लाखो कर्मचारी या भागात कामाला येत असतात. येथील वाहतूककोंडीने सर्वचजण हैराण होतात. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी ‘पॉड’ टॅक्सी चालवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. ही पॉड टॅक्सी वांद्रे ते कुर्ला रेल्वे स्थानकांना जोडणार असून बीकेसी परिसरातून धावणार आहे.

एमएमआरडीएने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प ८.८० किमीचा असून त्यात ३८ रेल्वे स्टेशन असतील. या प्रकल्पासाठी १०३८ कोटी रुपये खर्च होणार आहे.

सध्या बीकेसीत मोठमोठ्या कंपन्यांची कार्यालये आहेत. जवळपास ४ लाखांहून अधिक कर्मचारी तेथे काम करतात. तसेच येथील कार्यालयात भेट देणाऱ्या लोकांचीही मोठी गर्दी असते. यामुळे या भागात वाहतूककोंडी कायमच असते.

‘द पॉड टॅक्सी’ तासाला ४० किमी वेगाने धावणार आहे. यातून प्रवाशांना सहजपणे व आरामदायी प्रवास करणे शक्य होईल.

हा प्रकल्प खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर चालवला जाईल. त्यासाठी बीकेसी परिसरात ५ हजार चौरस मीटरचा डेपो तयार केला जाईल. या परिसरातील वाहतुकीची मागणी लक्षात घेऊन हा प्रयोग केला जाणार आहे.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र अभियांत्रिकी संस्थेची गरज लागणार आहे. त्यासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहेत. या प्रकल्पामुळे मुंबईतील नागरी वाहतूक क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत.

असा असेल पॉड

- प्रत्येक पॉड ३.५ मीटर लांब, १.४७ मीटर रुंद तर १.८ मीटर उंचीचा असेल.

- या पॉडमधून सहा प्रवाशांची वाहतूक होऊ शकेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in