अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या विवाहात बॉम्बच्या अफवेने तणाव; गुजरात येथून आयटी इंजिनिअर तरुणाला अटक

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळादरम्यान बॉम्बस्फोट घडवण्याचा मेसेज...
अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या विवाहात बॉम्बच्या अफवेने तणाव; गुजरात येथून आयटी इंजिनिअर तरुणाला अटक
Viral Bhayani/Instagram
Published on

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळादरम्यान बॉम्बस्फोट घडवण्याचा मेसेज पाठवून तणावाचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी एका २४ वर्षांच्या आयटी इंजिनिअरला गुजरात येथून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. विरल कल्पेश आशरा असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला गिरगाव येथील स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शनिवारी ‘डुकरे २०२४’ या ट्विटर अकाऊंटवरून एक मॅसेज प्राप्त झाला होता. त्यात अंबानीच्या लग्नात पिन कोडमध्ये ट्रिलियम बॉम्ब फेकला, तर अर्धे जग उलटून जाईल, असे नमूद करण्यात आले होते. बॉम्बस्फोटाच्या या धमकीनंतर जिओ वर्ल्ड सेंटरमधील सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ करण्यात आली होती. दुसरीकडे सायबर सेल पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना विरलला त्याच्या वडोदरा येथील राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच बॉम्बचा मॅसेज पाठविल्याचे तपासात उघडकीस आले. त्याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील मोबाईल जप्त केला आहे. याच मोबाईलवरून त्याने बोगस ट्विटर अकाऊंट उघडून बॉम्बचा मॅसेज पाठविला होता. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी सायबर सेल पोलिसांकडे सोपविण्यात आले होते.

logo
marathi.freepressjournal.in