मुंबई
निर्मल डेव्हलपर्सचे धर्मेश आणि राजीव जैन यांना अटक; मुंबई पोलिसांनी दीड वर्षांनंतर केली कारवाई
मुलुंडच्या ३० ग्राहकांकडून पैसे घेऊनही फ्लॅट्सचा ताबा न दिल्याचा होता आरोप, २०२१च्या डिसेंबरमध्ये झाला होता गुन्हा दाखल
आज निर्मल लाईफस्टाईलचे डेव्हलपर्स धर्मेश जैन आणि राजीव जैन यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर ग्राहकांकडून पैसे घेऊनही फ्लॅट्स न दिल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
२०२१च्या डिसेंबरमध्ये निर्मल डेव्हलपर्सचे धर्मेश जैन आणि राजीव जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून घेतला होता. यावेळी त्यांनी मुलुंडमधील ३० ग्राहकांकडून पैसे घेऊनही फ्लॅट्सचा ताबा न दिल्याचा आरोप करण्यात आला होता. अखेर तब्बल दीड वर्षांनंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांना अटक करण्यात आली. मुलुंडमध्ये सुरु असलेल्या एका प्रोजेक्टबद्दल हे प्रकरण आहे.