कंट्रोल रूमला फोने आला आणि म्हणाला मुंबईत पुन्हा ९३ सारखे साखळी बॉम्बस्फोट होणार

मुंबईमध्ये १९९३ साली जसे साखळी बॉम्बस्फोट घडविण्यात आले, पुन्हा एकदा तसेच साखळी बॉम्बस्फोट येत्या २ महिन्यात होणार असल्याची फोनवरून धमकी
कंट्रोल रूमला फोने आला आणि म्हणाला मुंबईत पुन्हा ९३ सारखे साखळी बॉम्बस्फोट होणार
@ANI
Published on

आज सकाळी पोलीस कंट्रोल रूमवर एका अज्ञात इसमाचा फोन आला आणि त्याने मुंबईत पुन्हा एकदा १९९३ सारखे साखळी बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर संपूर्ण प्रशासन कमला लागले आणि दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एका संशयित इसमाला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चोकशी करण्यात येत असून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही.

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आलेल्या फोनवर १९९३ प्रमाणे साखळी बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. फोन करणाऱ्याने मुंबईत दोन महिन्यांनंतर माहिम, भेंडीबाजार, नागपाडा, मदनपुरा याठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचे सांगितले. तसेच, यासाठी बाहेरच्या राज्यातून लोकांना बॉम्ब ब्लास्ट आणि दंगली करण्यासाठी बोलावले असून यामध्ये एका काँग्रेस आमदाराचा हात असल्याचा दावादेखल करण्यात आला. यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण पोलीस विभागात खळबळ माजली होती. यासंदर्भात एटीएसला माहिती दिल्यानंतर २ पथके तयार करण्यात आली.

एटीएसच्या एका पथकाने ५५ वर्षीय नबी याहया खान उर्फ के.जी.एन. लाला याला मालाड रेल्वे स्थानकाजवळ अटक करण्यात आली. तो मालाडच्या पठाणवाडीमध्ये राहत होता. त्याच्यावर यापूर्वी मुंबईमध्ये चोरी करणे, विनयभंग तसेच अतिक्रमण करणे असे १२ गुणे दाखल आहेत. २०२१मध्ये त्याला मालाड पोलिसांनी तडीपार केले असल्याची माहिती देण्यात येत आहे. अद्याप याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसून त्याची चौकशी सुरु आहे.

logo
marathi.freepressjournal.in