मुंबई पोलिसांची अभिनेता इम्रान खानला नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे आदेश

इमिग्रेशन आणि फॉरेनर्स ॲक्टच्या (परदेशी नागरिक कायदा) नियमांचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता आणि अमेरिकन नागरिक इम्रान खान याला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे आदेश देत नोटीस बजावली आहे.
मुंबई पोलिसांची अभिनेता इम्रान खानला नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे आदेश
मुंबई पोलिसांची अभिनेता इम्रान खानला नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे आदेश
Published on: 

मुंबई : इमिग्रेशन आणि फॉरेनर्स ॲक्टच्या (परदेशी नागरिक कायदा) नियमांचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता आणि अमेरिकन नागरिक इम्रान खान याला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे आदेश देत नोटीस बजावली आहे. दरम्यान, या नोटिशीविरोधात इम्रान खान याला मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई पोलिसांची अभिनेता इम्रान खानला नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे आदेश
Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...

मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात १० ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनांमध्ये अभिनेत्याच्या सहभागावरून ही कारवाई करण्यात आली आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी इम्रान खानला काही वेळ ताब्यातही घेतले होते.४३ वर्षीय इम्रान खान याने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले असून तो सुपरस्टार आमिर खानचा भाचा आहे.

मुंबई पोलिसांची अभिनेता इम्रान खानला नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे आदेश
Mumbai : '२८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडा'; ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनानंतर अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस

इम्रान खान हा परदेशी नागरिक असून तो भारतीय नाही. परदेशी नागरिक कायदा/इमिग्रेशन कायद्याच्या नियमांनुसार, परदेशी नागरिकांना भारतीय भूमीवर कोणत्याही राजकीय निदर्शनांमध्ये किंवा राजकीय उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास मनाई आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने स्पष्ट केले.अभिनेत्याला देश सोडण्याचे निर्देश देणारी औपचारिक नोटीस बजावण्यात आली असून त्याला त्याची प्रतही मिळाली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in