Mumbai : वृद्धावर चुकीचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी अंतर्गत चौकशी सुरू

वर्सोवा येथे कार चालवताना शरद कदम यांना कथित पक्षाघाताचा झटका आला, ज्यामुळे एक छोटा अपघात झाला. तरीही वर्सोवा पोलिसांनी त्यांच्यावर ‘मद्यप्राशन करून वाहन चालवल्याचा’ गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आता अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.
वृद्धावर चुकीचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी अंतर्गत चौकशी सुरू
वृद्धावर चुकीचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी अंतर्गत चौकशी सुरू
Published on

मुंबई : वर्सोवा येथे कार चालवताना शरद कदम यांना कथित पक्षाघाताचा झटका आला, ज्यामुळे एक छोटा अपघात झाला. तरीही वर्सोवा पोलिसांनी त्यांच्यावर ‘मद्यप्राशन करून वाहन चालवल्याचा’ गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आता अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर आवारी या प्रकरणाची चौकशी करत असून येत्या तीन ते चार दिवसांत ते आपला अहवाल सादर करतील अशी अपेक्षा आहे.

‘उत्तर विभाग ३’चे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी या चौकशीचे आदेश दिले आहेत. एका सहाय्यक पोलीस आयुक्तांमार्फत ही चौकशी केली जात असून, त्यांनी या घटनेचा तपशील नोंदवला आहे तसेच तपास करणाऱ्या आणि एफआयआर नोंदवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे. कदम यांच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण निश्चित करण्यासाठी वर्सोवा पोलीस अद्याप अंतिम रक्त तपासणी अहवालाची वाट पाहत आहेत.

‘द फ्री प्रेस जर्नल’शी बोलताना कदम यांचे पुतणे रोहन राठोड यांनी दावा केला की, नानावटी रुग्णालयात केलेली अल्कोहोल चाचणी नकारात्मक आली. मात्र, पोलिसांनी कूपर रुग्णालयातही अल्कोहोल चाचणी केली होती. सुरुवातीला कूपर रुग्णालयाने माझे काका मद्यधुंद असल्याचे पोलिसांना सांगितले.

कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी कदम यांना त्यांनी दारू प्यायली होती का, असे विचारले आणि नंतर त्यांनी दारू प्यायल्याचे मान्य केल्याची नोंद केली, असा आरोपही त्यांनी पुढे केला. ‘माझा प्रश्न असा आहे की, पक्षाघातामुळे जीभ पूर्णपणे अडखळत असताना ते असे विधान कसे करू शकतात? ते काय बोलत होते हे समजणेसुद्धा कठीण होते,’ असे राठोड यांनी स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in