थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे ऑल आऊट; ११२ ठिकाणी नाकाबंदी

नवीन वर्षांच्या स्वागतादरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शुक्रवारी रात्री मुंबई पोलिसांनी रात्री अकरा वाजता अचानक ऑल आऊट ऑपरेशन मोहीम सुरू केले होते. रात्री दोन वाजेपर्यंत ते ऑपरेशन सुरू होते.
थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे ऑल आऊट; ११२ ठिकाणी नाकाबंदी

मुंबई : थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशन मोहीम हाती घेऊन ५६१ पाहिजे आरोपी व ३२६ फरारी आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. शहरात एकूण २१७ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन तर ११२ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. यावेळी ७ हजार ९६४ वाहनांची तपासणी करण्यात आली. १ हजार ८०६ वाहनचालकाविरुद्ध विविध कलमांतर्गत, तर ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह मोहिमेंतर्गत ६३ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. नवीन वर्षांच्या स्वागतादरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शुक्रवारी रात्री मुंबई पोलिसांनी रात्री अकरा वाजता अचानक ऑल आऊट ऑपरेशन मोहीम सुरू केले होते. रात्री दोन वाजेपर्यंत ते ऑपरेशन सुरू होते. यावेळी पाच प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, तेरा झोनल पोलीस उपायुक्त, ४१ सहाय्यक पोलीस आयुक्त आणि सर्वच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या हद्दीत विशेष मोहीम हाती घेतली होती.

यावेळी पोलिसांकडून २१७ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवून ८८७ अभिलेखावरील गुन्हेगार तपासण्यात आले, त्यात पोलिसांना विविध गुन्ह्यांतील ५६१ पाहिजे तर ३२६ फरारी आरोपी सापडले. त्यापैकी २३ आरोपींना पोलिसांनी अटक केली.

११२ ठिकाणी नाकाबंदी

संपूर्ण मुंबई शहरात २१७ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले होते. त्यात ६१४ रेकॉर्डवरील आरोपीसह ४९० जेल रिलीज आरोपींना तपासण्यात आले. त्यापैकी ५० आरोपींविरुद्ध १५१ कलमांतर्गत कारवाई करण्यात आली. यावेळी ११२ ठिकाणी नाकाबंदी ठेवण्यात आली होती. त्यात ७ हजार ९६४ दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी तपासण्यात आले. १ हजार ८०६ विना हेल्मेट दुचाकी वाहनचालकांविरुद्ध, मोटार वाहन कायद्यांतर्गत १ हजार ३५५ चालकांविरुद्ध कारवाइ्र करण्यात आली होती. तसेच ६३ मद्यपी चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मुंबई शहरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने एकूण ६४८ हॉटेल्स, लॉज आणि मुसाफिरखाने यांची तपासणी करण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in