दोन महिन्यांच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या जोडप्याला अटक

पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुटका केलेल्या दोन महिन्यांच्या बालिकेला पालकांच्या स्वाधीन केले
दोन महिन्यांच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या जोडप्याला अटक

फोर्ट परिसरातून मंगळवारी दोन महिन्यांच्या बालिकेचे अपहरण करणाऱ्या जोडप्याला १२ तासांच्या आत अटक करण्यात आझाद मैदान पोलिसांना यश आले. पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुटका केलेल्या दोन महिन्यांच्या बालिकेला पालकांच्या स्वाधीन केले.

फोर्ट येथील एल. टी. मार्गावरील सेंट झेअविर्स हायस्कूल समोरील पदपथावर मनीषा शेखर पती आणि तीन अल्पवयीन मुलींसह राहते. एका अज्ञात व्यक्तीने मंगळवारी रात्रीच्या मनीषाच्या बालिकेचे अपहरण केले. याप्रकरणी मनीषाने बुधवारी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या बालिकेचा शोध घेण्यासाठी दक्षिण प्रादेशिक विभागातील सर्व पोलीस ठाण्यांतील गुन्हे अन्वेषण अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश असलेली पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण, सीसी टीव्ही चित्रणाची पाहणी, प्रत्यक्ष घटनास्थळी चौकशी, पालकांचा पूर्वइतिहास, पूर्वी झालेल्या घटना, रेल्वे स्थानकावर चौकशी आदी तपासासाठी स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in