मुंबई पोलिसांनी चढवली माहीम दर्ग्यावर चादर

जमिनीलगतच्या थंड हवेमुळे जगभरात हिवाळ्यात उन्हाळ्यापेक्षा वायू प्रदूषणाचे प्रमाण अधिक असते.
मुंबई पोलिसांनी चढवली माहीम दर्ग्यावर चादर
PM

मुंबई : माहिमी दर्ग्याच्या उरूसाच्या निमित्ताने मुंबई पोलिसांकडून मखदूम शाह बाबाच्या दर्ग्यावर उरुसाची पहीली चादर चढवण्याचा मान पूर्ण करण्यात आला. दरवर्षी २७ डिसेंबर ते पुढचे दहा दिवस हे साजरा होणारा माहीमच्या हजरत पीर मखदुम शाह बाबा दर्ग्याचा उरुस आणि माहीम मेळा यंदाही उत्सहात साजरा केला जातो. उरुसाच्या १० दिवसांत देशभरातून जवळपास ५००हून अधिक मानाच्या चादर दर्ग्यात येत असतात, त्यात मुंबई पोलीस हे चादर चढवतात हे सर्वाचे आकर्षण आहे.

पीर मखदूम शाह बाबाच्या दर्ग्यावर उरुसाची पहिली चादर चढवण्याचा मान मुंबई पोलिसांचा आहे. आज ज्या ठिकाणी माहीम पोलिस स्टेशन उभं आहे, तिथंच पीर मखदुमशाह बाबा यांची बैठक होती, असा इतिहास आहे, असे सांगितले जाते. १९२३ मध्ये माहीम पोलीस ठाणे स्थापन झाले होते आणि त्यामुळे १०० वर्षांहून जास्त काळ ही परंपरा चालत आली आहे. माहीम पोलीस स्टेशनमधून दरवर्षी वाजत गाजत मुंबई पोलीस बाबांची चादर घेऊन संपूर्ण माहीमला फेरी मारुन बाबांच्या दर्ग्यात चादर चढवतात. यावेळी मुंबई पोलिसांचे बँड पथकही सहभागी होऊन आपली सलामी दर्शवतात.

माहीमच्या मखदूम शाह बाबा दर्ग्याचा उरुस गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. माहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर लागणारे जायंट व्हील हे या माहीम मेळाचे मुख्य आकर्षण असते. तसेच समुद्र किनाऱ्यावर मोठी जत्रा भरते आणि सगळीकडे उत्साह आणि उत्सवाचे वातावरण असते. 

 ​हिवाळ्यात उन्हाळ्यापेक्षा वायू प्रदूषणाचे प्रमाण अधिक

जमिनीलगतच्या थंड हवेमुळे जगभरात हिवाळ्यात उन्हाळ्यापेक्षा वायू प्रदूषणाचे प्रमाण अधिक असते. उत्तर भारतात पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांसोबत येणारे धुराचे लोट हिमालयामुळे अडले जाऊन दिल्ली आणि लगतच्या क्षेत्रात वायू प्रदूषणात वाढ होत असते. महाराष्ट्रात मात्र या काळातील वाऱ्यांच्या स्थितीमुळे प्रदूषणकारी कण दूर वाहून जाऊन प्रदूषणात वाढ होत नाही. सध्या मात्र, वाऱ्यांच्या विशिष्ट स्थितीमुळे मुंबई आणि परिसरात उत्सर्जित होणारे कण वेगाने वाहून न गेल्यामुळे प्रदूषणाच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in