
मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षेला एका अनोळखी इसमाचा आलेल्या फोन कॉलने एकच खळबळ उडाली. यात पाकिस्तानावरून दोन लोक भारतात दाखल होणार असून ते लोक सागरी मार्गाने मुंबईत प्रवेश करणार आहेत. हे लोक मुंबईतील सुप्रसिद्ध ताज हॉटेल उडवणार असल्याची घक्कादाक माहिती या कॉलद्वारे अज्ञात मानसाने दिली. मिळालेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्याने पोलिसांना त्याची ओळख मुकेश सिंह अशी सांगितली.
पोलिसांनी या घटनेचा ताबडतोब शोध घेऊन त्या माणसाची खरी ओळख शोधून काढली आहे. कॉल करणाऱ्या व्यक्तीचं खरं नाव जगदंबा प्रसाद सिंह असल्याचे समोर आलं आहे. हा ५३ वर्षीय वयाचा व्यक्ती उत्तर प्रदेशातील गोंडा येथील असून सध्या तो मुंबईच्या पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ येथे राहतो.
ज्यावेळी त्याने कॉल केला होता त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. मुंबईतील ताज