मुंबईत वर्षभरात ७०० कोटींचे अंमली पदार्थ जप्त

नवीन वर्षाच्या स्वागतापूर्वीच मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करीविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम राबवली आहे. २०२५ मध्ये पोलिसांनी आतापर्यंत ७०० कोटींपेक्षा अधिक किंमतीचे विविध अंमली पदार्थ जप्त केले असून, हा आतापर्यंतचा वार्षिक विक्रम ठरला आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतापूर्वीच मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करीविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम राबवली आहे. २०२५ मध्ये पोलिसांनी आतापर्यंत ७०० कोटींपेक्षा अधिक किंमतीचे विविध अंमली पदार्थ जप्त केले असून, हा आतापर्यंतचा वार्षिक विक्रम ठरला आहे. येत्या ३१ डिसेंबरला प्रयत्न करत आहेत. या माहितीच्या आधारे आणि न्यू इयर सेलिब्रेशन लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी गेल्या महिनाभरात शहरात विशेष आणि धडक मोहिमा राबवल्या आहेत.

गेल्या महिन्यातील कारवाईत 'एनडीपीएस' कायद्यान्वये गुन्हेगार ठरलेले ३,०१५ ड्रग हिस्ट्रीशीटर्सवर विशेष नजर ठेवण्यात आली आहे. जेणेकरून ३१ डिसेंबरच्या रात्री अंमली पदार्थाची तस्करी आणि पुरवठा पूर्णपणे रोखला जाईल.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, न्यू इयर सेलिब्रेशन सुरक्षित आणि अंमली पदार्थमुक्त राहणे हा आमचा सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे. अंमली पदार्थ पार्टी सर्किटपर्यंत पोहोचू दिले जाणार नाहीत,' असे त्यांनी स्पष्ट केले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सणासुदीच्या काळात अंमली पदार्थांचे नेटवर्क डावलण्यासाठी यंदा आतापर्यंत १३७२ तस्करांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय, ड्रग्जचे सेवन करणाऱ्या ६,२०० पेक्षा जास्त व्यक्तींवरही कारवाई करण्यात आली आहे.

नवीन वर्षाच्या अगोदर, मुंबईतील ३० पेक्षा जास्त संवेदनशील ठिकाणी नाइटलाइफ हब्स, किनारा परिसर, महामार्ग आणि लोकप्रिय पार्टी स्पॉट्स येथे कठोर नजर ठेवण्यात आली आहे. क्लब्स, संभाव्य रेव्ह पार्टी साइट्स आणि मोठ्या कार्यक्रमांवर पोलिस व गुप्तचर यंत्रणांची पथके तैनात आहेत.

दुसऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ३१ डिसेंबरच्या रात्री ड्रग्ज पार्टीपर्यंत पोहोचू नयेत म्हणून विशेष गस्त आणि पाळत वाढवली जाईल आणि यासाठी अनेक विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त नवनाथ ढवळे म्हणाले की, पोलिसांनी यावर्षी पाच अंमली पदार्थ उत्पादन युनिट्सचा पर्दाफाश केला असून त्यामुळे अंमली पदार्थांचे नेटवर्क कमकुवत झाले आहे. नवीन वर्षाच्या काळात आमचे विशेष लक्ष हेच राहील की अंमली पदार्थ पार्टीपर्यंत पोहोचू नयेत.

logo
marathi.freepressjournal.in