Urfi Javed : मुंबई पोलिसांनी चित्रा वाघ यांच्या तक्रारीची घेतली दखल ; उर्फीला पाठवली नोटीस

उर्फी जावेदची आंबोली पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात येणार आहे. उर्फीला आज हजर राहण्याची नोटीस देण्यात आली
Urfi Javed : मुंबई पोलिसांनी चित्रा वाघ यांच्या तक्रारीची घेतली दखल ; उर्फीला पाठवली नोटीस
Published on

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात सोशल मीडियावर युद्ध सुरू आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या फॅशनवर टीका केली. त्यानंतर उर्फीने चित्रा वाघ यांच्या ट्विटला उत्तर दिले. उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली होती. आता मुंबई पोलिसांनी चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल घेतली आहे. सार्वजनिक प्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस पाठवली आहे.

उर्फी जावेदची अडचण चांगलीच वाढू शकते. सार्वजनिक अंगप्रदर्शन प्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस पाठवली. उर्फी जावेदची आंबोली पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात येणार आहे. उर्फीला आज हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक  पोलिस निरीक्षक शैला कोराडे करणार आहेत.

उर्फी अभिनय, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये काम करते. उर्फीने दुर्गा, सात फिरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी माँ, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीझन 2 आणि कसौटी जिंदगी की यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in