मुंबई : मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याच्या प्रक्रियेत वन टाईम पासवर्ड (ओटीपी) मिळण्यात अडचणी येत होत्या. करनिर्धारण व संकलन खात्याने याबाबत प्रणालीस्तरावरील त्रुटी दूर केल्या आहेत. त्यामुळे मालमत्ता कर 'ऑनलाईन' भरण्याची प्रक्रिया सुरळीत झाली आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले.
नागरिकांनी मालमत्ता कर भरणा करण्यासाठी प्रथम स्वतःच्या मोबाईलवर उपलब्ध असलेल्या जीपे - युपीआय सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. कर निर्धारण व संकलन खात्याने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कराची सुमारे सव्वा सहा लाख देयके निर्गमित केली आहेत. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या https:// www.mcgm. gov.in या संकेतस्थळावर मालमत्ताकर देयके उपलब्ध आहेत. मालमत्ता करप्रणालीचे सर्व्हर नवीन क्लाऊडवर स्थलांतरीत केले आहेत.