मुंबईतील मालमत्ता कराची देयके उपलब्ध; ऑनलाइनसह सीएफसी केंद्रांतही कर भरण्याची सुविधा

मुंबई महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची देयके जारी करण्यात आली आहेत. १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीतील मालमत्ता कराची देयके २१ जुलै २०२६ पासून महापालिकेच्या मालमत्ता कर पोर्टलवर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
मुंबईतील मालमत्ता कराची देयके उपलब्ध; ऑनलाइनसह सीएफसी केंद्रांतही कर भरण्याची सुविधा
मुंबईतील मालमत्ता कराची देयके उपलब्ध; ऑनलाइनसह सीएफसी केंद्रांतही कर भरण्याची सुविधा
Published on

मुंबई : मुंबई महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची देयके जारी करण्यात आली आहेत. १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीतील मालमत्ता कराची देयके २१ जुलै २०२६ पासून महापालिकेच्या मालमत्ता कर पोर्टलवर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुदतीत मालमत्ता कर भरणा करा आणि कारवाई टाळा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

पालिकेचा आर्थिक स्रोत असलेला जकात कर बंद झाल्यानंतर मालमत्ता कर संकलनावर प्रशासनाने भर दिला आहे. मोठ्या थकबाकीदारांवर पालिकेने नियमानुसार कारवाई केली आहे. आता सन २०२६-२७या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची देयके मालमत्ताधारकांना उपलब्ध करण्यात आली आहेत. मुंबईतील मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्तेचा कर किती आहे, हे ऑनलाइन तपासून तो वेळेत भरता येणार आहे. तसेच मालमत्ताधारकांना छापील देयकेही वितरित करण्यात आली आहेत. भूखंड प्रवर्गातील मालमत्ता वगळता इतर सर्व मालमत्तांचा देयकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. मालमत्ताधारकांना मुदतीत ऑनलाइन अथवा विभाग कार्यालयांतील नागरी सुविधा केंद्रांमध्ये जाऊन मालमत्ता कराचा भरणा करता येणार आहे. मालमत्ता कर मुदतीत न भरल्यास

मुंबई महापालिका अधिनियमातील कलम २०२ नुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यामुळे दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी देय तारखेपूर्वीच कराचा भरणा करावा, असे स्पष्ट केले आहे. केवायसी केलेले नसले तरी ऑनलाइन भरणा करता येणार आहे. केवायसी पूर्ण केलेल्या पण अद्याप न केलेल्यांनाही ऑनलाइन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

घरबसल्या अनेक पर्याय

नागरिकांना घरबसल्या मालमत्ता कर भरता यावा यासाठी विविध ऑनलाइन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. NEFT, RTGS, Google Pay, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड यांचा वापर करून कर भरता येणार आहे. तसेच सिटी बँक, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या पेमेंट गेटवेचाही वापर करता येणार आहे. मालमत्ता कर ऑनलाइन कसा भरायचा आणि केवायसी नोंदणी कशी करायची, याची सविस्तर माहिती महापालिकेच्या मालमत्ता कर पोर्टलवर देण्यात आली आहे.

सीएफसी केंद्रांवरही कर भरण्याची सुविधा !

ऑनलाइन कर भरण्याबरोबरच ऑफलाइन भरण्याची सुविधाही सुरू ठेवण्यात आली आहे. नागरिकांना संबंधित महापालिका विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात जाऊन रोख रक्कम, धनादेश किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे मालमत्ता कर भरता येणार आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in