

मुंबई : मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत मालमत्ता कर असून मालमत्ता कर न भरणारे पालिकेच्या रडारवर आले आहेत. वारंवार सूचना देऊनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या २० बड्या थकबाकीदारांना मालमत्ता जप्त करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, नोटीस बजावल्यानंतर कर भरणा करावा अन्यथा जप्त मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, असा इशारा पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आश्विनी जोशी यांनी दिला आहे.
निर्धारित कालावधीमध्ये कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना महानगरपालिकेकडून कलम २०३ अन्वये जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे.
अशी केली जाते कारवाई
मालमत्ताकर देयके मिळाल्यापासून ९० दिवसांच्या आत मालमत्ता कर जमा करणे आवश्यक आहे. तरीही न भरल्यास टप्पेनिहाय कारवाई सुरू करण्यात येते. अधिकारी प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद साधून कर भरण्यासाठी पाठपुरावा करतात. तरीही मालमत्ता कर न भरल्यास ‘डिमांड लेटर’ पाठवण्यात येते. पुढच्या टप्प्यात २१ दिवसांची अंतिम नोटीस दिली जाते. त्यानंतर मालमत्ता जप्ती, लिलाव कारवाई केली जाते.
‘'टॉप २०' थकबाकीदार
रघुवंशी मिल्स - १४० कोटी ६१ लाख ६८ हजार
राजहंस असोसिएट्स - ४७ कोटी ०२ लाख ९९ हजार
आशापदारा डेव्हलपर्स - ४४ कोटी ८७ लाख ८० हजार
सुमेर बिल्टकॉर्प - ३९ कोटी ३० लाख ४७ हजार
समीर भोजवानी - ३१ कोटी ७३ लाख २३ हजार
डीबीएस रिऍल्टी - २९ कोटी १२ लाख २१ हजार
आमीर पार्कस् अँड ॲम्युझमेंट - २७ कोटी ७९ लाख ५५ हजार
डीबीएस रिऍल्टी - २२ कोटी ४२ लाख ६० हजार
डीबीएस रिऍल्टी - २२ कोटी ४० लाख ४८ हजार
एस. डी. कॉर्पोरेशन - २१ कोटी ४३ लाख ४२ हजार
ए. आर. जाफर - २१ कोटी ३ लाख ३६ हजार
डीबीएस रिऍल्टी - २० कोटी ५६ लाख ३३ हजार
डीबीएस रिऍल्टी - २० कोटी ५६ लाख ३० हजार
डीबीएस रिऍल्टी - २० कोटी ५५ लाख ६२ हजार
डीबीएस रिऍल्टी - २० कोटी ५४ लाख १८ हजार
डीबीएस रिऍल्टी - २० कोटी ५४ लाख ०४ हजार
डीबीएस रिऍल्टी - २० कोटी ५३ लाख ४६ हजार
गॅलेक्सी कॉर्पोरेशन - २० कोटी २२ लाख ८२ हजार
डीबीएस रिऍल्टी - १९ कोटी १० लाख ४१ हजार
डीबीएस रिऍल्टी - १८ कोटी ६७ लाख ६९ हजार