Mumbai-Pune Express Way : भरधाव वेगात आलेल्या मालवाहू ट्रकने तब्बल 5 वाहनांना दिली धडक

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल
Mumbai-Pune Express Way : भरधाव वेगात आलेल्या मालवाहू ट्रकने तब्बल 5 वाहनांना दिली धडक

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai Pune express way) होणारे अपघात मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाही. आठवडाभरापूर्वी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच आज पहाटेच्या सुमारास द्रुतगती मार्गावर सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे.

खोपोलीजवळ भरधाव वेगात आलेल्या मालवाहू ट्रकने तब्बल 5 वाहनांना धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, वाहनांचा चक्काचूर झाला. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in