Mumbai Pune Expressway Accident : मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात; एकाच मृत्यू

मुंबई पुणे महामार्गावर (Mumbai Pune Expressway Accident) एका लग्न समारंभातून परतत असताना ३५ प्रवाशांनी भरलेल्या बसला कंटेनरने धडक दिली.
Mumbai Pune Expressway Accident : मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात; एकाच मृत्यू

मुंबई पुणे महामार्गावर (Mumbai Pune Expressway Accident) भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली. लग्नाला जाणाऱ्या एका खासगी बसला कंटेनर येऊन धडकला. यामध्ये एकाच मृत्यू झाला असून २२ प्रवासी जखमी झाले आहेत. ३५ प्रवाशांनी भरलेली ही बस लग्न सामाभरांतून परत येत असताना हा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चुरडा झाला. तसेच, काही तास मुंबई पुणे महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

खोपोली जवळ बोरघाटात कंटेनरची एका खाजगी बसला मागच्या बाजूने धडक दिली. यामध्ये बसच्या मागच्या बाजूचा अक्षरशः चुरडा झाला आहे. या भीषण अपघातात कंटेनर चालकाचा मृत्यू झाला. तसेच, जखमींना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही बस सिंधुदुर्ग येथे लग्नाला गेली होती. तर, कोल्हापूरमार्गे वाशिंदला परत येताना हा भीषण अपघात घडला. अपघाताची माहिती मिळतातच बचाव कार्य सुरु झालं असून मदतीसाठी आयआरबी , देवदूत, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in