Mumbai-Pune Expressway : पनवेलजवळ पोलीस उपनिरिक्षकाचा अपघाती मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रविवारी पहाटे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मुंबई पोलीस उपनिरिक्षकाचा मृत्यू झाला आहे.
Mumbai-Pune Expressway : पनवेलजवळ पोलीस उपनिरिक्षकाचा अपघाती मृत्यू

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रविवारी पहाटे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मुंबई पोलीस उपनिरिक्षकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला असून मृत पोलीस उपनिरीक्षकाचे नाव सूरज चौगुले (वय ५५) आहे. पोलीस उपनिरिक्षक सूरज चौगुले हे विक्रोळी येथील पार्कसाईट पोलीस ठाण्यात तैनात होते.

सूरज चौगुले त्यांच्या मारुती सूझुकी कारने घरी जात असताना त्यांचा भीषण अपघात झाला. चौगुले हे रविवारी (२१ एप्रिल) पहाटे ३ वाजताच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारहून घरी परत असताना ही दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

चौगुलेंचे कारवरील नियंत्रण सुटले

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चौगुुले यांनी कार चालविताना सीटबेल्ट लावला नव्हता आणि चौगुलेंचे कारवरचे नियंत्रण सुटल्याने त्यांची कार ही एक्स्प्रेस वेच्या मुंबईकडे जाणाऱ्या पहिल्या लेनकडे असलेल्या रेलिंगवर आदळली. यावेळी कारमध्ये रेलिंग घुसले, विंडशील्ड तुटले आणि कार चालवणारे चौगुलेंना दुखापत झाली. या अपघातावेळी चौगुलेंकडून योग्यवेळी एअरबॅग्ज उघडले नाही, अशी माहिती रिपोर्टमधून मिळाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in