मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात; तब्बल ७ गाड्यांची एकमेकांना धडक

आज घडलेल्या अपघातामुळे पुन्हा मुंबई ते पुणेदरम्यान असलेल्या द्रुतगती मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात; तब्बल ७ गाड्यांची एकमेकांना धडक
Published on

आज मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात पाहायला मिळाला. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनमध्ये तब्बल ७ गाड्यांनी एकमेकांना धडक दिली. या विचित्र अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक काहीकाळ थांबवण्यात आली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. ४ जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आज झालेल्या पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या खोपोलीजवळ एकमेकांना धडकल्या. यामध्ये गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले असून काही गाड्यांचा चक्काचूर झाला आहेत. या संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावरून या अपघाताची दाहकता दिसून येत आहे.

दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला? हे अद्याप कळू शकलेले नाही. या अपघातामुळे वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सुरु असलेल्या अपघातांच्या मालिकांमुळे आता सुरक्षेवर प्रशचिन्ह उभे राहिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in