मुंबई- पुणे प्रवास महागणार! टोलच्या दरांमध्ये झाली एवढी वाढ

१ एप्रिलपासून मुंबई आणि पुणे प्रवास महागणार असून टोलच्या दरांमध्ये वाढ होणार असल्याची माहिती देण्यात आली
मुंबई- पुणे प्रवास महागणार! टोलच्या दरांमध्ये झाली एवढी वाढ

मुंबई-पुणे प्रवास आता पहिल्यापेक्षा आणखीन महाग होणार आहे. कारण, १ एप्रिलपासून मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर तब्बल १८ टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. त्यामुळे आता नव्या दरानुसार मुंबई - पुणे एक्स्प्रेसवेवर चारचाकीचा टोल २७० रुपयांवरून ३१६ रुपये होणार आहे. तर, बससाठी ७९५ रुपयांएवजी ९४० रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच, ट्रकसाठी ५८० रुपयांवरून ६८५ रुपये भरावे लागणार आहेत.

२००४मध्ये एक अधिसूचना काढण्यात आली होती. यानुसार, बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या टोलमध्ये दर ३ वर्षांनी १८ टक्के वाढ करण्याबाबत सूचना देण्यात आली होती. या अधिसूचनेनुसार २०२३मध्ये टोलवाढ करण्यात येणार आहे. याआधी १ एप्रिल २०२०मध्ये टोलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यामुळे आता मुंबई पुणे असा प्रवास करणाऱ्यांना चाकरमान्यांना हा प्रवास पहिल्यापेक्षा महाग पडणार आहे. कारण, दरवाढ लागू झाल्यानंतर प्रवाशांना तब्बल ५० ते ७० रुपये इतका टोल जास्त द्यावा लागणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in