मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे आज दोन तास बंद राहणार

मुंबईकडे जाणारी वाहतूक २४ जुलै रोजी बंद ठेवण्यात आली होती
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे आज दोन तास बंद राहणार

मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रूतगती महामार्ग लोणावळा येथे सुरू असलेल्या कामामुळे शुक्रवारी दुपारी दोन तास बंद राहणार आहे. एमएसआरडीसीने यासंदर्भातील माहिती दिली आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर लोणावळा एक्झिट येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे. हे काम १ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. या कामासाठी दुपारी १२ ते दुपारी २ वाजेपर्यंत पुण्याच्या दिशेकडील वाहतूक पूर्णत: बंद राहील, अशी माहिती देण्यात आली आहे. जुलै महिन्यात जोरदार पावसामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर खंडाळा घाटात दोन ठिकाणी दरड कोसळली होती. त्यावेळी मुंबईकडे जाणारी वाहतूक २४ जुलै रोजी बंद ठेवण्यात आली होती

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in