Mumbai: मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवर शनिवारी नाइट ब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकादरम्यान सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक आहे.
Mumbai: मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवर शनिवारी नाइट ब्लॉक
Published on

मुंबई : रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर्सच्या देखभाल दुरुस्तीसाठी रविवार, ३० नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे, तर पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानकादरम्यान शनिवारी रात्री १२.१५ ते ४.१५ या कालावधीत ब्लॉक असेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकादरम्यान सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक आहे.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील, असे रेल्वेने कळवले.

पश्चिम रेल्वेचा रात्रकालीन ब्लॉक

ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ पर्यंत ४ तासांचा ब्लॉक घेतला आहे. ब्लॉक दरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या सांताक्रूझ आणि चर्चगेट स्टेशनांदरम्यान धीम्या मार्गावर धावतील. यामुळे रविवार, ३० नोव्हेंबर रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात दिवसा कोणताही ब्लॉक राहणार नाही.

logo
marathi.freepressjournal.in