मुंबईसह राज्यभर पाऊसधारा ! सलग दुसऱ्या दिवशी पावसाचे धूमशान; वाहतूककोंडीमुळे प्रवाशांचे हाल, रेल्वे रुळांवर साचले पाणी

शुक्रवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते.
मुंबईसह राज्यभर पाऊसधारा ! सलग दुसऱ्या दिवशी पावसाचे धूमशान; वाहतूककोंडीमुळे प्रवाशांचे हाल, रेल्वे रुळांवर साचले पाणी
Published on

मुंबई : मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने सलग दुसऱ्या दिवशी दमदार बरसात करत पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा दिला. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी दिवसभर पाऊसधारा कोसळल्याने गोविंदांमध्ये चैतन्याचे वातावरण होते. पण, सकाळच्या सत्रात रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने त्याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला. दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने रस्त्यांवरील साचलेले पाणी ओसरले. तथापि, शुक्रवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. अंधेरी सबवे, हिंदमाता, माटुंगा, किंग्ज सर्कल, दादर, माहीम, धारावी, परळ, शिव, कुर्ला, विद्याविहार, सांताक्रुझ, चेंबूर, अंधेरी, मुलुंड, दहिसर आदी ठिकाणच्या सखल भागांत पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने वाहतूककोंडी झाली होती, तर नेहमीप्रमाणे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद केल्याने वाहतूक मंदावली होती.

सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील अनेक रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने धावतच होती. तर चेंबूर ते कुर्लादरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी स साचल्यामुळे ट्रेन हळूहळू पुढे सरकत होत्या. चुनाभट्टी रेल्वे प स्थानकातील ट्रॅकवर पाणी साचल्याचे दिसून आले. दरम्यान, मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्थानकातील प रूळालगत पाणी साचल्याने घाटकोपरच्या पुढे गाड्या संथगतीने सुरू होत्या. तर मध्य रेल्वेची वाहतूक ३० ते ३५ मिनिटे उशिराने धावत होती. तसेच, पश्चिम रेल्वे वि मार्गावरील गाड्या १० मिनिटे उशिराने धावत होत्या.

मुंबईच्या शुक्रवारी सकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली. तसेच, दहीहंडी उत्सवानिमित्त १०० हून अधिक गोविंदा पथक मोठ्या संख्येने बाहेर निघाल्याने वाहतूक मार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहनचालकांना या वाहतूक कोंडीमुळे एक तासाच्या प्रवासासाठी २ ते अडीच तासांचा कालावधी लागत होता.

जोरदार पावसामुळे पडझडीच्या घटना घडल्या. शहरात २, पूर्व उपनगरांत १ आणि पश्चिम उपनगरांत १६ अशा एकूण १९ ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या कोसळल्या. या अ घटनेत कोणालाही मार लागलेला नाही. पूर्व उपनगरांत ३ तर पश्चिम उपनगरात २ अशा एकूण ५ ठिकाणी घराचा भाग, भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या. यात कोणीही जखमी झालेले नाही.

मुंबईत पाणी साचणाऱ्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. पुरेसे पंप लावल्याने साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यात आला. गोविंदाचा जल्लोष दिवसभर तसेच रात्री ११ वाजेपर्यंत राहत असल्याने यंत्रणाकडून खबरदारी स घेण्यात आली होती. जखमी गोविंदांवर पालिकेच्या रुग्णालयात तत्काळ दाखल करून त्यांच्यावर निशुल्क उपचार करण्याचे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले होते. सर्व आवश्यक यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या होत्या.

धरणातील पाणीपातळीत वाढ

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रामध्येही पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. त्यामुळे धरणसाठा स्थिरावला होता. परंतु, शुक्रवारपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे शनिवारी तलाव क्षेत्रातील पाणी साठ्यात वाढ झाली असून पाणीसाठी ९०.१६ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईकरांची पुढील वर्षभराची तहान भागेल, इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in