Mumbai : राणी बागेत लवकरच सिंहगर्जना होणार; राणी बाग-सकरबाग प्राणीसंग्रहालयात करार

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयात सिंहाची डरकाळी लवकरच कानी पडणार आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची बुधवारी भेट घेतली.
Mumbai : राणी बागेत लवकरच सिंहगर्जना होणार; राणी बाग-सकरबाग प्राणीसंग्रहालयात करार
Mumbai : राणी बागेत लवकरच सिंहगर्जना होणार; राणी बाग-सकरबाग प्राणीसंग्रहालयात करार प्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयात सिंहाची डरकाळी लवकरच कानी पडणार आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची बुधवारी भेट घेतली. यावेळी राणी बाग सकरबाग प्राणीसंग्रहालयाचा सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले. ही भेट सकारात्मक ठरली आहे.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय अर्थात राणी बागेत तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा सिंहांचे आगमन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची विनंती मान्य करून जुनागढ येथील सक्करबाग प्राणिसंग्रहालयाला पालिकेसोबत सिंहांच्या देवाण घेवाणीसाठी सामंजस्य करार करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे राणीबागेत २ नर व २ मादी अशा चार आशियाई सिंहांच्या आगमनाची शक्यता आहे.

पिंजरा रिकामी

राणीबागेतील सिंहांचा पिंजरा २०१४ पासून रिकामा आहे. शेवटची सिंहिण 'जिमी' हिचा डिसेंबर २०१४ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी आजाराने मृत्यू झाला. मार्च १९९८ मध्ये राणीबागेतच जन्मलेल्या जिमीचे वडील आफ्रिकी सिंह अमर, तर आई आशियाई सिंहिण अनीता होती. त्यामुळे जिमी ही आफ्रिकी आणि आशियाई सिंहांची संकरित प्रजाती होती. तिच्या मृत्यूनंतर राणीबागेत एकही सिंह नसल्याने सिंहांचा पिंजरा ओस पडला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)