Mumbai : राणीबागेतील पेंग्विनना वाढती मागणी; हैदराबाद, साखरबाग, जुनागढ झू कडून विचारणा

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या पेंग्विनची डिमांड आता वाढली आहे. हैद्राबाद, साखरबाग, जुनागढ येथील झू प्राधिकरणांनी राणी गेतील पेंग्विन मिळावेत, यासाठी राणीबाग झू प्राधिकरणाला पत्रव्यवहार केला आहे.
Mumbai : राणीबागेतील पेंग्विनना वाढती मागणी; हैदराबाद, साखरबाग, जुनागढ झू कडून विचारणा
Mumbai : राणीबागेतील पेंग्विनना वाढती मागणी; हैदराबाद, साखरबाग, जुनागढ झू कडून विचारणा
Published on

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या पेंग्विनची डिमांड आता वाढली आहे. हैद्राबाद, साखरबाग, जुनागढ येथील झू प्राधिकरणांनी राणी गेतील पेंग्विन मिळावेत, यासाठी राणीबाग झू प्राधिकरणाला पत्रव्यवहार केला आहे. मात्र, ज्या प्राणिसंग्रहालयांनी पेंग्विनची मागणी केली, त्या प्राणिसंग्रहालयांमध्ये पेंग्विनसाठी पोषक असे वातावरण नसल्याने पेंग्विनच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तूर्तास तरी येथील २१ पेंग्विन हे राणीबागेतील प्राणिसंग्रहालयातच असणार आहेत, अशी माहिती प्राणीसंग्रहालयाचे डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली. दरम्यान, राणी बागेत पेंग्विनसाठी पोषक वातावरण आहे.

दक्षिण मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय पर्यटकांचे आकर्षण. पालिकेच्या या उद्यान व प्राणी संग्रहालयात १५ पेंग्विन, दोन वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत. या शिवाय २५६ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षी आहेत. त्यामुळे बच्चेकंपनीसह मोठ्यांचेही राणीबाग हे आकर्षणाचे केंद्र बिंद आहे.. राणी बागेला दररोज ७ ते ८ हजार पर्यटक भेट देतात. सणासुदीच्या काळात, सार्वजनिक सुट्टी व शनिवार व रविवारी तर पर्यटकांचा आकडा ३५ ते ४० हजारांपर्यंत जातो. मुंबईकर, देशविदेशातील पर्यटकांची तोबा गर्दी होते.

पेंग्विनची धमाल मस्ती सर्वांना भावते

राणी बागेत येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरतंय ते पेंग्विन. २६ जुलै २०१६ मध्ये राणी बागेत ८ कोरियावरुन हंबोल्ड पेंग्विन आणण्यात आले. मात्र १८ ऑक्टोबर २०१६ रोजी जंतूसंसर्ग होऊन एका पेंग्विनचा दुर्दैवी मृत्यू झाला. परंतु हळुवार पेंग्विनना वातावरण सूट झाले असून सद्यस्थितीत पेंग्विनची संख्या २१ वर पोहोचली आहे. पेंग्विनची धमाल मस्तीची बच्चे कंपनीसह लहान मोठ्यांना भुरळ पडते. त्यामुळे पेंग्विनची धमाल मस्ती अनुभवण्यासाठी येणाऱ्या पर्यटक आवर्जून पेंग्विन कक्षाला भेट देतात. पेंग्विनची धमाल मस्ती अनुभवण्यासाठी येणारे पर्यटक विशेषतः बच्चे कंपनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी करतात. मुंबईकरांच्या पसंतीस उतरले पेंग्विनची डिमांड देशातील अन्य राज्यात वाढली आहे.

logo
marathi.freepressjournal.in