मुंबई तापाने फणफणली! महिनाभरात मलेरियाच्या १,३८० रुग्णांची नोंद; डेंग्यूचे ४६६, तर लेप्टोचे ७८ रुग्ण

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा मुंबईला घट्ट विळखा पडला आहे. जुलै महिन्यात मलेरियाच्या १,३८० रुग्णांची नोंद झाली असून डेंग्यू ४६६, लेप्टोच्या ७८ रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबई तापाने फणफणली! महिनाभरात मलेरियाच्या १,३८० रुग्णांची नोंद; डेंग्यूचे ४६६, तर लेप्टोचे ७८ रुग्ण
मुंबई तापाने फणफणली! महिनाभरात मलेरियाच्या १,३८० रुग्णांची नोंद; डेंग्यूचे ४६६, तर लेप्टोचे ७८ रुग्ण 'एआय' ने संपादित केलेली प्रतिमा
Published on

मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा मुंबईला घट्ट विळखा पडला आहे. जुलै महिन्यात मलेरियाच्या १,३८० रुग्णांची नोंद झाली असून डेंग्यू ४६६, लेप्टोच्या ७८ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत २३ लाख १ हजार ९४२ लोकांचा सर्व्हे केला असून ७५ हजार ६५० लोकांचे रक्ताचे नमुने तपासणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, मलेरिया, डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत एडिस व ॲनोफिलीस डासांची २७ हजार ८९३ उत्पत्तीस्थाने आढळली आहेत. त्यामुळे मुंबईत मलेरिया, डेंग्यू, लेप्टोने थैमान घातले असून मुंबई तापाने फणफली आहे.

यंदा जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून वरुणराजाची दमदार इनिंग सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात तीन दिवस पाऊस बरसला आणि विविध आजारांचा प्रादूर्भाव वाढला आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी पाय रोवले आहेत. साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस आणि स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली आढळून आल्याचे पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सर्व पालिका रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांच्या परिसरात मलेरिया व डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी नियमित सर्वेक्षण, अळीनाशक फवारणी आणि

पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा नायनाट करून ‘शून्य डास प्रजनन मोहीम’ प्रभावीपणे राबवली जात आहे.

मुंबईत कोरोना दबा धरून

मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि शेकडो मुंबईकरांना जीव गमवावा लागला. आज सहा वर्षांनंतर कोरोनाचा प्रादूर्भाव कायम असून जून महिन्यात कोरोनाचे २७ रुग्ण आढळले होते, तर जुलै महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून ५८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने मुंबईत आजही कोरोना दबा धरून असल्याचे स्पष्ट होत आहे.

ही काळजी घ्यावी

साबण आणि पाण्याने वारंवार हात धुणे.

योग्य आहार व आराम करणे

अतिजोखमीच्या व्यक्ती विशेषतः कमी प्रतिकारशक्ती असलेल्या रुग्णांनी योग्य ती काळजी घ्यावी.

अशी झाली रुग्णांची नोंद

जुलै महिन्यांतील रुग्णांची नोंद

मलेरिया - १,३८०

डेंग्यू - ४६६

लेप्टो - ७८

गॅस्ट्रो - ८५१

एच१ एन१ - १७५

चिकनगुनिया - ७

मलेरियाच्या प्रादुर्भावास कारणीभूत आळ्या

ॲॅनोफिलीस - ५,९६९

डेंग्यूच्या फैलावास कारणीभूत, एडिस - २१ हजार ९२४

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in