रस्ते अपघातात ५० टक्के पादचाऱ्यांचा मृत्यू; मुंबई रस्ता सुरक्षा वार्षिक अहवाल

मुंबई रस्ता सुरक्षेचा वार्षिक अहवाल सन २०२३ नुसार रस्ते अपघातातील एकूण मृत्यूंपैकी ४४ टक्के मृत्यू पादचाऱ्यांचे होतात. त्यामुळे सुरक्षित, सलग आणि सर्वांसाठी सुलभ पदपथ निर्माण करणे आवश्यक असल्याने महानगरपालिकेने पादचारी प्रथम अभियान हाती घेतले आहे.
रस्ते अपघातात ५० टक्के पादचाऱ्यांचा मृत्यू; मुंबई रस्ता सुरक्षा वार्षिक अहवाल
रस्ते अपघातात ५० टक्के पादचाऱ्यांचा मृत्यू; मुंबई रस्ता सुरक्षा वार्षिक अहवाल
Published on

मुंबई : मुंबई रस्ता सुरक्षेचा वार्षिक अहवाल सन २०२३ नुसार रस्ते अपघातातील एकूण मृत्यूंपैकी ४४ टक्के मृत्यू पादचाऱ्यांचे होतात. त्यामुळे सुरक्षित, सलग आणि सर्वांसाठी सुलभ पदपथ निर्माण करणे आवश्यक असल्याने महानगरपालिकेने पादचारी प्रथम अभियान हाती घेतले आहे.

पादचाऱ्यांना चालण्यासाठी पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. पादचारी प्रथम अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात २०० फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यापैकी ८१ पदपथांचे काम हाती घेतले आहे. गेल्या १४ दिवसांत सुमारे ६८ किमी पदपथ अडथळामुक्त केले.

फुटपाथवरील अतिक्रमणावरून मुंबई उच्च न्यायालयाने अनेकदा मुंबई महापालिकेला खडे बोल सुनावले. अखेर मुहूर्त पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी अतिक्रमणमुक्त फुटपाथवर लक्ष केंद्रित केले.

या अभियानाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत १ ते १४ ऑगस्ट २०२६ या १४ दिवसांच्या कालावधीत एकूण ३३७ कारवाया केल्या आहेत. यात ७७ अनधिकृत बांधकामे आणि ११२६ अनधिकृत फेरीवाल्यांचे निष्कासन केले. पदपथांवरील ४९ स्ट्रीट फर्निचर, ६३ साठवणूक साहित्य, २७दुकानांचे फलक, १४ साइनबोर्ड आणि ४९ बॅनर हटवले. पादचाऱ्यांच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या २५ अधिकृत दुकानांलगतच्या संरचनांची दुरुस्ती, ८ पदपथांची दुरुस्ती तसेच पदपथांवर निर्माण झालेल्या ८ अनधिकृत वाहनतळांचे निर्मूलन करण्यात आले आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्यात येत आहे. पदपथ हे केवळ पादचाऱ्यांच्या ये-जा करण्याचे साधन नसून शहरातील सुरक्षित आणि समावेशक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत, या भूमिकेतून महानगरपालिका प्रशासनाकडून पदपथ सुधारणा आणि अतिक्रमण निर्मूलनाला प्राधान्य देण्यात येत आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in