रस्ते कामात बाधित होणाऱ्या झाडांसाठी नव्याने संरेखण; अतिरिक्त आयुक्त बांगर यांचे निर्देश, ‘फिल्ड ड्राय डेन्सिटी’ चाचणी अनिवार्य

मुंबई महापालिका क्षेत्रात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यादरम्यान रस्ते काँक्रिटीकरण करताना ड्राय लीन काँक्रिटचा थर टाकला जातो.
रस्ते कामात बाधित होणाऱ्या झाडांसाठी नव्याने संरेखण; अतिरिक्त आयुक्त बांगर यांचे निर्देश, ‘फिल्ड ड्राय डेन्सिटी’ चाचणी अनिवार्य
Published on: 

मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यादरम्यान रस्ते काँक्रिटीकरण करताना ड्राय लीन काँक्रिटचा थर टाकला जातो. त्याची योग्यता तपासण्यासाठी सर्व ठिकाणी 'फिल्ड ड्राय डेन्सिटी' चाचणी अनिवार्य आहे. तसेच बोरिवली पश्चिम येथील श्री. अय्यप्पा मंदिर मार्गाच्या काँक्रिट कामात झाडे बाधित होत असल्याचे आढळल्याने रस्त्याचे संरेखन सुधारित करून झाडे वाचवण्याचे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले.

रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या उद्देशाने संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामे वेगाने सुरू आहेत. या अंतर्गत पश्चिम उपनगरातील रस्ते काँक्रिटीकरण कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यामध्ये, सांताक्रूझ पूर्व येथील श्री अग्रसेन महाराज चौक, जोगेश्वरी पूर्व येथील हनुमान नगर, नटवर नगर, गोरेगाव पश्चिम येथील पवनबाग मार्ग आणि बोरिवली पश्चिम येथील श्री. अय्यप्पा मंदिर मार्ग येथील कामांचा समावेश होता.

सांताक्रूझ पूर्व येथील श्री अग्रसेन महाराज चौक आणि गोरेगाव पश्चिम येथील पवनबाग मार्ग येथे पेव्ह्मेंट क्वा लिटी काँक्रिट (PQC) कामापूर्वी ड्राय लीन काँक्रिट टाकण्याबचे काम सुरू होते. त्या नंतर बांगर यांनी जोगेश्वरी पूर्व येथील हनुमान नगर येथे सध्या सुरू असलेल्याट रस्तेय कामाची आणि त्यालगत पहिल्याा टप्या पूरत नटवर नगर येथे करण्याुत आलेल्याय रस्ते काँक्रिटीकरण कामाची पाहणी केली.

एकाच दिवशी १०१ रस्त्यांचे काँक्रिटीकरण

पश्चिम उपनगरांत एकाच दिवशी १०१ रस्त्यांच्या कामात मिळून तब्बल ३ हजार ११६ घनमीटर काँक्रिट टाकण्यात आले. त्या१चा आढावा घेत बांगर म्ह णाले की, रस्ते कामांची गती वाढली आहे, हे यातून सिद्ध होते आहे. कामांची गती वाढवताना कामांच्या गुणवत्तेशी वेगाचा योग्य ताळमेळ साधावा. जे रस्ते हाती घेतलेले नाहीत, त्या रस्त्यांवर खड्डे उद्भवणार नाहीत, याची दक्षता बाळगावी. अतिरिक्त मनुष्यहबळाचा वापर करून उर्वरित कामे जलद गतीने मार्गी लावण्याचे आदेश बांगर यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in