रस्ते काँक्रीटीकरणाला १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरुवात; १५ ऑगस्टला रस्ते कामांची यादी पालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध होणार

मुंबईतील रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामांना १ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या कामांबाबत पालिकेतर्फे नागरिकांना आधीच माहिती दिली जाणार आहे. १५ ऑगस्टला रस्ते कामांची यादी पालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे.
रस्ते काँक्रीटीकरणाला १ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरुवात; १५ ऑगस्टला रस्ते कामांची यादी पालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध होणार
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

देवश्री भुजबळ / मुंबई

मुंबईतील रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामांना १ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या कामांबाबत पालिकेतर्फे नागरिकांना आधीच माहिती दिली जाणार आहे. १५ ऑगस्टला रस्ते कामांची यादी पालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहे.

ज्या रस्त्यांची कामे अर्धवट झालेली आहेत ती कामे सर्वात आधी केली जातील. त्यानंतर अन्य रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली जाणार आहे. २०२७ च्या अखेरपर्यंत रस्ते काँक्रीटीकरणाची कामे पूर्ण केली जाणार आहेत, असे पालिकेच्याच्या रस्ते व ट्रॅफिक विभागाचे मुख्य अभियंता गिरीश निकम यांनी सांगितले.

पालिकेतर्फे मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे ३१ मे रोजी थांबवण्यात आली होती. आता पावसाळा संपल्यानंतर पुन्हा ही कामे सुरू केली जाणार आहेत. एकूण ४९ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. हा प्रकल्प जुलै २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सुरू करण्यात आला होता. शहरातील रस्ते खड्डेमुक्त करणे हा उद्देश या प्रकल्पाचा आहे. मुंबईतील एकूण २,१२१ रस्त्यांवर काम करण्याचे नियोजन आहे. या रस्त्यांची एकूण लांबी ६९८.४४ किलोमीटर आहे.

३१ मे पर्यंत, १,३८५ रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्याची लांबी ३४२.७४ किलोमीटर आहे. तर ६१४ रस्त्यांचे (१५६.७४ किलोमीटर) काम अर्धवट झाले आहे. १ ऑक्टोबरपासून या ६१४ रस्त्यांवर काम पुन्हा सुरू होईल. उर्वरित ७३६ रस्त्यांचे काम नंतर केले जाईल.

नोंदवलेल्या तक्रारींची स्थिती कळवा

बुधवार एका बैठकीत, पालिका आयुक्त भूषण गागराणी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ तोडगा काढण्याचे निर्देश दिले तसेच नागरिकांना त्यांच्या नोंदवलेल्या तक्रारींची स्थिती कळवा, आधीच्या चांगल्या स्थितीत असलेल्या रस्त्याच्या कडेला असलेले पदपथ तोडू नका, असे निर्देश दिले.

logo
marathi.freepressjournal.in