Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांवर बलात्काराचा आरोप करण्यासाठी महिलेचा शोध? आव्हाडांच्या पत्नीचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या पत्नीने केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली आहे
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांवर बलात्काराचा आरोप करण्यासाठी महिलेचा शोध? आव्हाडांच्या पत्नीचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. पण, यावेळी त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड (Ruta Awhad) यांनी केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आधीच विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. आता त्यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप करण्यासाठी महिलेचा शोध सुरु आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी ट्विट केले की, "मला आत्ताच सूत्रांकडून कळले की ३५४नंतर, ३७६ (बलात्कार)चा आरोप करण्यासाठी महिला तयार करण्याचा घाट घातला जात आहे. खात्रीलायक व्यक्तिने हे सांगितले आहे." असे ट्विट करत त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टॅग केले आहे.

१३ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंब्रा-शिळफाटा वाय-जंक्शन उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी आले असता, ती महिला इतर लोकांसमवेतच मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जात असताना जितेंद्र आव्हाडांनी त्यांचा हात धरून बाजूला ढकलले. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर रिदा राशीद यांनी विनयभंगाची तक्रार केली होती. त्यानंतर ३५४ कलमाअंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in