

मुंबई : सातत्याने वाढणाऱ्या डिझेल आणि इंधनाच्या किमतींमुळे स्कूल बसचालक-मालक संघटनेने (एसबीओए) चिंता व्यक्त केली आहे. संघटनेने शाळांसाठी ‘हायब्रिड मॉडेल’ दिले असून त्यानुसार शाळांनी आठवड्यातून ३ दिवस प्रत्यक्ष वर्ग आणि २ दिवस ऑनलाइन वर्ग चालवावेत, असा प्रस्ताव शाळांना दिला आहे. यामुळे बसच्या फेऱ्या कमी होऊन इंधनाचा खर्च वाचेल, असा उद्देश संघटनेचा आहे.
आधीच वाढलेला देखभाल खर्च, विमा हप्ते, परवाने आणि कर्मचाऱ्यांचे पगार यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या बस ऑपरेटर्सना आता इंधन दरवाढीमुळे बस शुल्कात वाढ करावी लागण्याची शक्यता आहे. परंतु, पालक आणि विद्यार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, म्हणून संघटनेने शुल्क वाढवण्याऐवजी शाळांना काही व्यवहार्य पर्याय सुचवले आहेत. त्यानुसार एसबीओए संघटनेचे काही प्रस्ताव दिले आहेत. शाळांनी आठवड्यातून ३ दिवस प्रत्यक्ष वर्ग आणि २ दिवस ऑनलाइन वर्ग चालवावेत.