Mumbai : समुद्राचे पाणी दूषित; तातडीने उपाययोजना करण्याची नगरसेवकांची मागणी

सांडपाणी समुद्रात सोडल्याने समुद्राचे पाणी दूषित होत असून समुद्रातील जीवांना धोका निर्माण झाला आहे. सांडपाणी समुद्रात जाऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने उपायोजना हाती घेऊन, समुद्रात जाणारे सांडपाणी व कचरा रोखून माशांचं अन्य जलचर प्राण्यांना जीवदान द्या, अशी मागणी मंगळवारी महापालिका सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली.
Mumbai : समुद्राचे पाणी दूषित; तातडीने उपाययोजना करण्याची नगरसेवकांची मागणी
Mumbai : समुद्राचे पाणी दूषित; तातडीने उपाययोजना करण्याची नगरसेवकांची मागणीप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : सांडपाणी समुद्रात सोडल्याने समुद्राचे पाणी दूषित होत असून समुद्रातील जीवांना धोका निर्माण झाला आहे. सांडपाणी समुद्रात जाऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने उपायोजना हाती घेऊन, समुद्रात जाणारे सांडपाणी व कचरा रोखून माशांचं अन्य जलचर प्राण्यांना जीवदान द्या, अशी मागणी मंगळवारी महापालिका सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली.

सांडपाण्यावर प्रक्रिया न करता हे पाणी समुद्रात सोडले जाते. त्यामुळे किनाऱ्यालगतच्या समुद्राचे पाणी दूषित झाले असून जलचर प्राणी, जीवसृष्टी यांना धोका निर्माण झाल्याची पालिका अधिनियम ६६ ब अन्वये चिंतामणी निवाटे यांनी पालिका सभागृहात प्रस्ताव मांडला. यावेळी सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी चिंता व्यक्त केली.

उबाठाच्या विशाखा राऊत यांनी आपण महापौर असताना नौदल अधिकाऱ्यांसोबत समुद्रकिनाऱ्याची पाहणी केली असता, समुद्रकिनाऱ्यालगतचे पाणी वेगवेगळ्या रंगांमध्ये दिसून आले. आजही तीच परिस्थिती असल्याचे राऊत त्यांनी सांगितले. दूषित पाण्यामुळे किनाऱ्यालगतची मासेमारी बंद करायची वेळ कोळी बांधवांवर आली आहे. त्यामुळे मासेमारीच्या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या छोट्या कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात शिंपल्या मिळत होत्या.

समुद्रात सांडपाण्याच्या वाहिन्या सोडल्याने घाण पाणी समुद्रात पसरत आहे. समुद्रात जाणारा कचरा रोखण्यासाठी महापालिकेकडे कोणतीही यंत्रणा नाही, असे नगरसेवक म्हणाले.

प्रक्रिया करूनच पाणी समुद्रात सोडले जाते

सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते पाणी समुद्रात सोडले जाते. परंतु २०२७ पर्यंत भांडुप, वर्सोवा, बांद्रा, वरळी, धारावी, घाटकोपर सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू होणार आहेत. या प्रक्रिया केंद्रात सांडपाण्यावर द्वितीय दर्जाची प्रक्रिया करून ते पाणी समुद्रात सोडले जाईल. त्यामुळे समुद्रलगतचे पाणी दूषित होणार नसल्याचे यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in