मुंबईत मलेरिया, डेंग्यूचे थैमान! डेंग्यूच्या रुग्णांमध्ये २८ तर मलेरियाच्या रुग्णांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ; आजारांमुळे पालिका प्रशासनाची धावपळ

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. गेल्या सात महिन्यांत मुंबईत मलेरियाच्या ३,६८१, डेंग्यूच्या ९३८ आणि लेप्टोच्या १५७ रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबईत मलेरिया, डेंग्यूचे थैमान! डेंग्यूच्या रुग्णांमध्ये २८ तर मलेरियाच्या रुग्णांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ; आजारांमुळे पालिका प्रशासनाची धावपळ
मुंबईत मलेरिया, डेंग्यूचे थैमान! डेंग्यूच्या रुग्णांमध्ये २८ तर मलेरियाच्या रुग्णांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ; आजारांमुळे पालिका प्रशासनाची धावपळप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. गेल्या सात महिन्यांत मुंबईत मलेरियाच्या ३,६८१, डेंग्यूच्या ९३८ आणि लेप्टोच्या १५७ रुग्णांची नोंद झाली आहे.

विशेष म्हणजे, यंदा पाऊस कमी पडला असताना साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. मुंबईत ३६ लाख ८१ हजार ६८३ लोकांचा सर्व्हे करण्यात आला असून १० लाख ४७२ लोकांचे रक्ताचे नमुने तपासणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, मलेरिया, डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या एडिस व अॅनोफिलीस डासांची २७ हजार ३८२ उत्पत्तीस्थाने आढळून आली आहेत. त्यामुळे मुंबईत मलेरिया, डेंग्यू, लेप्टोचे थैमान आणखी वाढत जाणार आहे.

यंदा जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून वरुणराजाची दमदार इनिंग सुरू आहे. जुलै महिन्यापासून पावसाची दमदार इनिंग झाली आणि साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. जानेवारी ते १४ जुलै २०२६ पर्यंत मलेरिया ३६८१, डेंग्यू ९३८, लेप्टो १५७, गॅस्ट्रो ३,८६६ कावीळ आणि चिकुनगुनियाचे ३१ तसेच स्वाईन फ्लूचे ११३ रुग्ण आढळले आहेत. जुलै महिन्याच्या गेल्या दोन आठवड्यात साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाल्याने मुंबईत मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू , गॅस्ट्रो धोका वाढला आहे.

साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. तीन हजारांहून अधिक बांधकाम ठिकाणची झाडाझडती घेतली. यात ५४ हजार ७६३ मजुरांच्या रक्ताचे नमुने तपासले असता, ३७ मजुरांना मलेरियाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

  • मलेरियाच्या प्रादुर्भावास कारणीभूत अळ्या ॲनोफिलीस - ५,३४१

  • डेंग्यूच्या फैलावास कारणीभूत एडिस अळ्या - २२ हजार ४१

  • अडगळीचे सामान व टायर काढले - ६६, ५९५

अशी झाली रुग्णांची नोंद

जानेवारी ते जुलै २०२६

  • मलेरिया - ३,६८१

  • डेंग्यू - ९३८

  • लेप्टो - १५७

  • गॅस्ट्रो - ३,८६६

  • एच वन एन वन - ११३

  • चिकनगुनिया - ३१

  • कोविड - १९ - ७१

चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये मोठी घट

चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये ८२.७ टक्क्यांची मोठी घट झाली असून हा आकडा १७९ वरून ३१ वर आला आहे. गॅस्ट्रोएन्टेरायटिसचे रुग्ण २० टक्क्यांनी घटून ४,८३१ वरून ३,८६६ झाले आहेत. कोव्हिड-१९ च्या संकरित रुग्णांमध्ये ९३ टक्क्यांहून अधिक घट झाली असून संख्या १,०४९ वरून ७१ वर आली आहे, तरीही ए१एन१ इन्फ्लूएंझाचे रुग्ण जवळपास तिप्पट वाढले असून त्यांची संख्या ४२ वरून ११३ झाली आहे.

याचे करावे पालन

  • साबण आणि पाण्याने हाथ धुणे.

  • योग्य आहार व आराम करणे,

  • अति जोखमीच्या व्यक्ती विशेषतः कमी प्रतिकार शक्ती असलेले रुग्ण उदाः कॅन्सर, वृद्ध नागरिक, मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी आजार, इत्यादी रुग्णांनी योग्य ती काळजी घ्यावी.

नागरिकांनी ताप असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, स्वतः औषधे घेणे टाळा आणि पालिकेची आरोग्यकेंद्रे, दवाखाना व रुग्णालयात जाऊन त्वरित सल्ला घ्या.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in