Mumbai : राष्ट्रपती पदक यादीतून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची हकालपट्टी

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांचे नाव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्तकर्त्यांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. काणे हे सांताक्रूझ पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे एक्स
Published on

मुंबई : वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांचे नाव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्तकर्त्यांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. काणे हे सांताक्रूझ पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. सामाजिक कार्यकर्ते आफताब सिद्दीकी यांनी काणे यांच्यावर खंडणीचा आरोप केल्यानंतर त्यांचे नाव हटवण्यात आले आहे. खंडणी प्रकरणात तक्रार दाखल करण्यास प्रतिबंध केल्याचा आरोप करत एका कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेही काणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

एक्स या आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सिद्दीकी यांनी याबाबत आरोप करत काणे यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्याचा वरदहस्त असल्याचा आरोप केला होता. सिद्दीकी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना ईमेल पाठवून पुरस्कार यादीतील काणे यांच्या नावावर आक्षेप घेतला होता.

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (डीजीपी) कार्यालयाने १४ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवडलेल्या ३९ पोलीस अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली होती. तत्पूर्वी, पोलिस महासंचालक कार्यालयाने काणे यांचे नाव यादीतून काढून टाकले.

logo
marathi.freepressjournal.in