

मुंबई : घरगुती हिंसाचार प्रकरणात सत्र न्यायालयाने पत्नीला मोठा दिलासा देत पोटगीच्या रकमेत दुपटीने वाढ केली. सत्र न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणातील अपील मंजूर करत पत्नी आणि मुलीसाठीची अंतरिम पोटगी मासिक २० हजार रुपयांवरून थेट ४७ हजार ५०० रुपयांवर वाढवली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश कुणाल जाधव हा निकाल दिला. पतीने तो महिना १ लाख २० हजार पगार घेत असल्याचा दावा केला होता. मात्र, पत्नीने आयकर विभागाकडून घेतलेली माहिती सादर केली. त्यातून माहिती समोर आली.
घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणातील तन्मया पाटील आणि राहुल राजे यांची ओळख जीवनसाथी वेबसाइटवर झाली. त्यानंतर लग्न झाले. तन्मयाने लग्नासाठी स्वतःच्या कमाईतून २० लाख रुपये खर्च केले. तसेच परदेश दौऱ्याचा खर्च केला व पतीसाठी लॅपटॉपसह अनेक वस्तू घेतल्या, असा दावा केला होता. लग्नानंतर त्यांना मुलगी झाली. मात्र, लग्नानंतर पतीकडून मानसिक, शारीरिक छळ सुरू झाला, असा आरोप तिने केला. छळाला कंटाळून माहेरी आई-वडिलांकडे राहावे लागल्याचे तिने अपिलमध्ये म्हटले होते.