Mumbai : तोंडी दाव्यांपेक्षा सरकारी कागदोपत्री पुरावे नेहमीच श्रेष्ठ; सत्र न्यायालयाचे निरीक्षण

वांद्रे पूर्वेकडील टॅक्सी ड्रायव्हरच्या हक्काच्या खोलीवर जबरदस्तीने कब्जा करणाऱ्या शेजाऱ्याला दिंडोशी दिवाणी न्यायालयाने मोठा दणका दिला.
Mumbai : तोंडी दाव्यांपेक्षा सरकारी कागदोपत्री पुरावे नेहमीच श्रेष्ठ; सत्र न्यायालयाचे निरीक्षण
Mumbai : तोंडी दाव्यांपेक्षा सरकारी कागदोपत्री पुरावे नेहमीच श्रेष्ठ; सत्र न्यायालयाचे निरीक्षण
Published on

मुंबई : वांद्रे पूर्वेकडील टॅक्सी ड्रायव्हरच्या हक्काच्या खोलीवर जबरदस्तीने कब्जा करणाऱ्या शेजाऱ्याला दिंडोशी दिवाणी न्यायालयाने मोठा दणका दिला. तोंडी दाव्यांपेक्षा सरकारी कागदोपत्री पुरावे नेहमीच श्रेष्ठ ठरतात, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत न्यायालयाने पीडित कुटुंबाला त्यांच्या हक्काच्या घराचा ताबा परत देण्याचे आदेश दिले. ११ वर्षे चाललेल्या या कायदेशीर लढ्यानंतर अखेर पीडित टॅक्सीचालकाच्या कुटुंबाला न्याय मिळाला.

वांद्रे पूर्व येथील संत ज्ञानेश्वर नगरमधील खोली क्रमांक-२४ ही मृत टॅक्सीचालक गोलिवाडा नरसय्या यांनी १९९० मध्ये मोहम्मद कासिम यांच्याकडून ९० हजार रुपयांना विकत घेतली होती. २००५ च्या महापुरात व्यवहाराची मूळ कागदपत्रे वाहून गेली आणि खराब झाली. मात्र, या पत्त्यावर कुटुंबाचे आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक आणि वीजबिल सुरू होते. ६ मे २०१५ रोजी गोलिवाडा हे आजारी मुलावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात व्यस्त असताना शेजारी राहणाऱ्या मोहम्मद दस्तीगीर याने गोलिवाडा यांच्या खोलीचे कुलूप तोडून आतल्या वस्तू फेकून दिल्या.

Mumbai : तोंडी दाव्यांपेक्षा सरकारी कागदोपत्री पुरावे नेहमीच श्रेष्ठ; सत्र न्यायालयाचे निरीक्षण
Thane : शिळफाटा येथे अवैध गोवंश कत्तल उघडकीस; सात जण अटकेत, ५०० किलो मांसासह वाहने जप्त

इतकेच नव्हे तर, मुख्य दरवाजावर भिंत बांधून ती खोली आतल्या बाजूने आपल्या रूम नंबर २३ ला जोडून घेतली. याविरोधात गोलिवाडा कुटुंबाने २०१५ मध्ये न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यानच्या काळात मूळ फिर्यादी गोलिवाडा शंकरय्या यांचे निधन झाले आणि त्यांच्या पत्नी व मुलांनी हा लढा पुढे सुरू ठेवला.

logo
marathi.freepressjournal.in