Mumbai : सायन रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या?

सायनच्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या डॉ. शिवचरण अप्पा पाटील या विद्यार्थ्याचा वसतिगृहातील खोलीत संशयास्पद मृत्यू झाला.
Mumbai : सायन रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या?
Mumbai : सायन रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या?संग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : सायनच्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या डॉ. शिवचरण अप्पा पाटील या विद्यार्थ्याचा वसतिगृहातील खोलीत संशयास्पद मृत्यू झाला. संबंधित विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

डॉ. पाटील हे सायन रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागात एमएस अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होते. शनिवारी संध्याकाळी भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाचा अतिमात्रेत वापर केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

त्यांच्या वसतिगृहातील खोलीचा दरवाजा शनिवारी संध्याकाळी बराच वेळ बंद असल्याने संशय आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती सायन पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याने दिली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in