Mumbai 'एसआयआर'मध्ये गोलमाल; एकाच व्यक्तीकडून एकाच दिवशी २४ अर्ज, धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई क्षेत्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्विलोकलनात (एसआयआर) गोलमाल झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रारूप मतदार यादीसंदर्भात दावे व हरकतीसाठी एकाच व्यक्तीने एकाच दिवशी २४ अर्ज दाखल केल्याचे समोर आले आहे.
Mumbai 'एसआयआर'मध्ये गोलमाल; एकाच व्यक्तीकडून एकाच दिवशी २४ अर्ज, धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Mumbai 'एसआयआर'मध्ये गोलमाल; एकाच व्यक्तीकडून एकाच दिवशी २४ अर्ज, धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई क्षेत्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्विलोकलनात (एसआयआर) गोलमाल झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रारूप मतदार यादीसंदर्भात दावे व हरकतीसाठी एकाच व्यक्तीने एकाच दिवशी २४ अर्ज दाखल केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात एका व्यक्तीविरोधात धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'एसआयआर २०२६' अंतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सर्व विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रारूप मतदार यादीसंदर्भात दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर २०२६ असा निश्चित केला आहे.

भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार, नमुना ७ चे जास्तीत जास्त १० अर्ज प्रतिदिन दाखल करण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 'नमुना ७' मध्ये जाणूनबुजून चुकीची माहिती किंवा घोषणा केल्याचे आढळल्यास संबंधित हरकतदाराविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ अन्वये कारवाईची तरतूद आहे. तरी १७८-धारावी विधानसभा मतदारसंघामध्ये गिरिधारी स्वामीनाथ जयस्वाल (रा. गंगाधरलाल चाळ, ९० फूट मार्ग, धारावी पूर्व) यांनी एकाच दिवशी २४ अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे निर्धारित नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. त्यानुसार, नियमांचे उल्लंघन करून खोटी व चुकीची माहिती देत नमुना ७ चे अर्ज दाखल केल्याप्रकरणी गिरिधारी स्वामीनाथ जयस्वालविरोधात लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ अन्वये धारावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in