Mumbai : सहा धरणांच्या सुरक्षेचे ऑडिट; तज्ज्ञ समिती दोन महिन्यांत अहवाल सादर करणार, पालिका ४५ लाख ९० हजार रुपये खर्च करणार

मुंबईकरांना दररोज पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, पिसे, तुळशी आणि विहार या सहा धरणांच्या सुरक्षेचे सर्वंकष मूल्यांकन करण्यात येणार आहे.
Mumbai : सहा धरणांच्या सुरक्षेचे ऑडिट; तज्ज्ञ समिती दोन महिन्यांत अहवाल सादर करणार, पालिका ४५ लाख ९० हजार रुपये खर्च करणार
Mumbai : सहा धरणांच्या सुरक्षेचे ऑडिट; तज्ज्ञ समिती दोन महिन्यांत अहवाल सादर करणार, पालिका ४५ लाख ९० हजार रुपये खर्च करणार
Published on: 

मुंबई : मुंबईकरांना दररोज पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, पिसे, तुळशी आणि विहार या सहा धरणांच्या सुरक्षेचे सर्वंकष मूल्यांकन करण्यात येणार आहे. धरणांची सद्यस्थिती, सुरक्षितता आणि संभाव्य धोके तपासून त्याबाबतचा अहवाल तयार करण्यासाठी तज्ज्ञ समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे. या कामासाठी पालिका ४५ लाख ९० हजार रुपये खर्च करणार आहे.

केंद्र सरकारच्या धरण सुरक्षा कायदा, २०२१ नुसार प्रत्येक निर्दिष्ट धरणाचे सर्वंकष सुरक्षा मूल्यांकन स्वतंत्र समितीकडून करणे बंधनकारक तज्ज्ञ आहे. या कायद्यानुसार मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सहा धरणांचे मूल्यांकन डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. या संदर्भात राज्य धरण सुरक्षितता संघटना आणि राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरणाकडूनही पालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मुदतीत अहवाल सादर न केल्यास दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र शासनाने नियुक्त

केलेल्या कोकण विभागातील धरण सुरक्षा मूल्यांकन समितीतील तज्ज्ञांकडून हे काम करून घेण्यात येणार आहे. प्रत्येक धरणासाठी स्थळभेट व मूल्यांकनासाठी ४ लाख ६५ हजार रुपये, तर प्रवास, निवास आणि भोजनासाठी ३ लाख रुपये, असा एकूण ७ लाख ६५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. सहा धरणांसाठी हा खर्च ४५ लाख ९० हजार रुपये होणार आहे.

धरणांच्या सुरक्षिततेचा फायदा काय?

तज्ज्ञांच्या तपासणीत धरणांच्या संरचनेतील संभाव्य त्रुटी, झीज, पाण्याच्या दाबाशी संबंधित धोके आणि दुरुस्तीची गरज यांचे मूल्यांकन करता येईल. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यास मदत होईल. धरणांची सुरक्षितता टिकवणे आणि मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, हा या मूल्यांकनाचा प्रमुख उद्देश आहे. मात्र, प्रत्यक्ष धोके आणि आवश्यक उपाययोजना अंतिम अहवालानंतरच स्पष्ट होतील.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in