मुंबईकरांच्या तक्रारी डस्टबीनमध्येच! निम्म्या तक्रारींचेच होते निराकरण; 'मुंबई स्पीक्स' सर्वेक्षणातून उघड

मुंबईतील ४७.६ टक्के नागरिक स्थानिक नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात; मात्र त्यापैकी ५७ टक्के नागरिकांच्या तक्रारींचेच निराकरण होते, असा खुलासा 'मुंबई स्पीक्स' या नागरिक सर्वेक्षणातून झाला आहे. या सर्वेक्षणात ७० टक्के मुंबईकरांना प्रभाग समित्यांविषयी माहिती नसल्याचे, तर ३५ टक्के नागरिकांना नगरसेवकाशी संपर्क कसा साधायचा हेच माहीत नसल्याचेही समोर आले आहे.
मुंबईकरांच्या तक्रारी डस्टबीनमध्येच! निम्म्या तक्रारींचेच होते निराकरण; 'मुंबई स्पीक्स' सर्वेक्षणातून उघड
Published on

धैर्य गजरा / मुंबई

मुंबईतील ४७.६ टक्के नागरिक स्थानिक नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात; मात्र त्यापैकी ५७ टक्के नागरिकांच्या तक्रारींचेच निराकरण होते, असा खुलासा 'मुंबई स्पीक्स' या नागरिक सर्वेक्षणातून झाला आहे. या सर्वेक्षणात ७० टक्के मुंबईकरांना प्रभाग समित्यांविषयी माहिती नसल्याचे, तर ३५ टक्के नागरिकांना नगरसेवकाशी संपर्क कसा साधायचा हेच माहीत नसल्याचेही समोर आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, मुंबई सिटिझन्स फोरम (एमसीएफ) या स्वयंसेवी संस्थेने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टिस) यांच्या सहकार्याने 'मुंबई स्पीक्स' या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर केले. या अहवालातून मुंबईकर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील दरी स्पष्टपणे समोर आली असून, नागरी व्यवस्थेतील रचनांबाबत मोठ्या प्रमाणावर असलेली अनभिज्ञता आणि नागरिकांच्या अधिक सहभागाची तीव्र इच्छा अधोरेखित झाली आहे.

आठ महिन्यांच्या कालावधीत करण्यात आलेल्या या अभ्यासात मुंबईतील सर्व २२७ नगरसेवक प्रभागांमधील ५,४५० नागरिकांच्या प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या. या अभ्यासातून नागरिकांमध्ये सहभागाची इच्छा असूनही औपचारिक यंत्रणा आणि आवश्यक माहितीच्या अभावामुळे ती मर्यादित राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सर्वेक्षणानुसार स्वच्छता, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ हवा आणि रस्त्यांवरील खड्डे या मूलभूत नागरी समस्या बहुसंख्य मुंबईकरांच्या प्रमुख चिंता आहेत. निम्म्या (४७.६%) प्रतिसादकर्त्यांनी स्थानिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले; मात्र ४२.६ टक्के नागरिकांनी तक्रार करूनही कोणतेही समाधान मिळाले नसल्याचे नमूद केले. 'मुंबई स्पीक्स' अहवालात स्थानिक प्रशासनाबाबतची गंभीर अनभिज्ञता ठळकपणे दिसून येते. सुमारे ७० टक्के प्रतिसादकर्त्यांना प्रभाग समित्यांविषयी माहिती नव्हती.

या महत्त्वाच्या असतात. त्याचप्रमाणे, समित्या स्थानिक पातळीवरील निर्णयांसाठी देशातील सर्वाधिक अर्थसंकल्प असलेल्या बीएमसीचा अर्थसंकल्प काय आहे, याची माहिती ७२ टक्के मुंबईकरांना नव्हती. ७५ टक्के नागरिकांना नागरी संस्थेचा व लोकप्रतिनिधींच्या स्थानिक क्षेत्र विकास निधीची माहिती नव्हती, तर तब्बल ३५ टक्के नागरिकांना आपल्या नगरसेवकाशी संपर्क कसा साधायचा हे माहीत नव्हते.

या सर्व अनभिज्ञतेनंतरही मुंबईकरांमध्ये स्थानिक कारभारात सक्रिय सहभाग घेण्याची तीव्र इच्छा असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. तब्बल ८८.७ टक्के नागरिकांनी आपल्या परिसराशी संबंधित निर्णय प्रक्रियेत अधिक सक्रियपणे सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. क्षेत्रसभा, प्रभाग समित्या, सोशल मीडिया आणि नागरिक मंच अशा विविध माध्यमांद्वारे सहभाग घेण्यास नागरिकांनी प्राधान्य दर्शवले आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणात निवडणूक प्रक्रियेतही मोठा उत्साह दिसून आला आहे. सुमारे ७२.५ टक्के नागरिक मतदान करण्याचा मानस व्यक्त करत असून, मतदानाद्वारे आपला आवाज बुलंद करण्यास मुंबईकर सज्ज असल्याचे सूचित होते.

मुख्य निष्कर्ष

  • ७०% मुंबईकरांना प्रभाग समित्यांची माहिती नाही

  • ३५% मुंबईकरांना नगरसेवकाशी संपर्क कसा साधायचा हे माहीत नाही

  • ७२% मुंबईकरांना बीएमसीचा अर्थसंकल्प माहीत नाही

  • ८८.७% मुंबईकर निर्णय प्रक्रियेत अधिक सहभागी होऊ इच्छितात

  • ७२.५% मुंबईकर आगामी पालिका निवडणुकांत मतदान करण्यास उत्सुक

सर्वेक्षण पद्धतः

प्रतिसादकर्ते : ५,४५०

झोपडपट्टीतील नागरिक : २,०४५ (३७.५%)

ठिकाण : सर्व २२७ प्रभाग

कालावधी : जानेवारी २०२३ ते ऑगस्ट २०२३

प्रमुख नागरी समस्या :

स्वच्छता, पाणी, घनकचरा, स्वच्छ हवा,

रस्त्यांवरील खड्डे

४७.६% मुंबईकरांनी स्थानिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला

पैकी केवळ ५७.४% नागरिकांच्या तक्रारींचेच निराकरण झाले

logo
marathi.freepressjournal.in