उन्हाळ्यामुळे मुंबईत पोटाचे विकार वाढले

दूषित पाणी व अन्नाद्वारे हा विकार होतो. यामुळे अतिसार, उलट्या होणे, ताप आदी त्याची लक्षणे आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, गॅस्ट्रोनायरिटीसमुळे रुग्णांना शरीरारातील पाणी कमी होणे, पोटात मुरडा होतो. अनेक जीवाणू, विषाणू दूषित पाण्यामुळे पोटात जातात.
उन्हाळ्यामुळे मुंबईत पोटाचे विकार वाढले

स्वप्नील मिश्रा/मुंबई

उन्हाचा कडाका आणि अन्न व पाण्यातील भेसळीमुळे मुंबईत पोटाचे विकार वाढले आहेत. पोटाच्या आजारामुळे ग्रस्त रुग्णांची संख्या ३५ ते ४० टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या दोन आठवड्यापासून ओपीडीत पोट विकार रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. तसेच लघवीच्या जागेवर इन्फेक्शन झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, अस्वच्छ पाणी प्यायल्याने पोटाचे विकार वाढले आहेत. सध्या उन्हाळा कडक असल्याने भरपूर पाणी प्यायले जात आहे. त्याच्या स्वच्छतेकडे अनेकांचे लक्ष नाही. पोटाशी संबंधित गॅस्ट्रोनायरिटीस हा पोटाच्या फ्लूचा प्रकार आहे. दूषित पाणी व अन्नाद्वारे हा विकार होतो. यामुळे अतिसार, उलट्या होणे, ताप आदी त्याची लक्षणे आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, गॅस्ट्रोनायरिटीसमुळे रुग्णांना शरीरारातील पाणी कमी होणे, पोटात मुरडा होतो. अनेक जीवाणू, विषाणू दूषित पाण्यामुळे पोटात जातात.

ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ म्हणाले की, तापमानात मोठे बदल होत असल्याने जीवाणूंना पोषक वातावरण निर्माण होत आहे. या इन्फेक्शनचा त्रास ५ वर्षांखालील मुलांना होत आहे.

जे. जे. रुग्णालयातील डॉ. मधूकर गायकवाड यांनी सांगितले की, रस्त्यावर खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेकांना पोटविकार उद्भवतात. घातक जीवाणूमुळे भारतातील अन्नपदार्थात विष तयार होत असते. दूषित पाणी व अन्नामुळे गॅस्ट्रोच्या रुग्णात वाढ होते. अन्न खाताना हात अस्वच्छ असल्यास अन्नातून विकार वाढू शकतात. तसेच निर्जलीकरण झाल्यास पोटाचे विकार वाढतात, असे ते म्हणाले.

गॅस्ट्रोचे रोज १५ ते २० रुग्ण

सध्या वातावरण उष्ण झाले आहेत. हवेतून इन्फेक्शन वाढले आहे. त्यामुळे गॅस्ट्रोच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते. तापमान वाढीमुळे या आजाराच्या विषाणूंची पैदास वाढते. त्यामुळे ओपीडीत रुग्णसंख्या वाढलेली दिसते. या आजाराचे रोज १५ ते २० रुग्ण आढळत आहेत. यापूर्वी रोज या आजाराचे ५ ते ६ रुग्ण आढळत होते, असे सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in