Mumbai : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कायम; महिनाभरात ३७८ तक्रारी, सोसायटीत खाद्य दिले, कुत्रा अंगावर धावून आला

मुंबईत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून सोसायटी समोरच खाद्य दिले, कुत्रा अंगावर धावून आला, इमारती समोरच घाण केली, कुत्र्याला दगड मारला, अशा तक्रारींचा पाऊस देवनार पशुवधगृहाकडे प्राप्त होत आहेत.
Mumbai : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कायम; महिनाभरात ३७८ तक्रारी, सोसायटीत खाद्य दिले, कुत्रा अंगावर धावून आला
Mumbai : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कायम; महिनाभरात ३७८ तक्रारी, सोसायटीत खाद्य दिले, कुत्रा अंगावर धावून आलाप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून सोसायटी समोरच खाद्य दिले, कुत्रा अंगावर धावून आला, इमारती समोरच घाण केली, कुत्र्याला दगड मारला, अशा तक्रारींचा पाऊस देवनार पशुवधगृहाकडे प्राप्त होत आहेत. गेल्या महिनाभरात तब्बल ३७८ तक्रारी प्राप्त झाल्याने मुंबईत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचे सांगण्यात आले.

राज्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून लहानांपासून मोठ्यांवर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या ९५ हजारांच्या आसपास आहे. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या मुंबई महापालिकेसह मुंबईकरांच्या डोक्याला त्रासदायक ठरत आहे. मुंबईत भटक्या कुत्र्यांची दहशत असून रात्री तर दूर सकाळी रस्त्यावर ये-जा करत असताना भटके कुत्रे अंगावर धावून येतात. दुचाकीस्वारांची पळता भुई होते.

मुलांसह मोठ्यांवरही हल्ला

मुंबईसह राज्यात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून लहान मुलांसह मोठ्यांचा चावा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांना जीवाला मुकावे लागले आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्यातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर अनेकदा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत भटक्या कुत्र्यांची दहशत असून सोसायटी परिसरात खाद्य घालण्यावरून लोकांमध्ये भांडण होतात.

भटक्या कुत्र्यांचा उपद्रवामुळे लोकांमध्ये संताप असून विविध कारणावरून लोक तक्रारी करत आहेत. जून महिन्यात तब्बल ३७८ तक्रारी प्राप्त झाल्या असून २७३ तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचे मुंबई महापालिकेच्या देवनार पशुवधगृहाकडून सांगण्यात आले.

अशा प्राप्त झाल्या तक्रारी अन् निवारण

  • वांद्रे - ८० तक्रार

  • तक्रारींचे निवारण - ७७

  • शिल्लक - ३

  • मुलुंड - १३०

  • तक्रारींचे निवारण - ८१

  • शिल्लक - ४९

  • मुलुंड - १३०

  • तक्रारींचे निवारण - ८१

  • शिल्लक - ४९

  • महालक्ष्मी - ४३ तक्रारी

  • तक्रारींचे निवारण - ३९

  • शिल्लक - ४

  • मालाड - १२५ तक्रारी

  • तक्रारींचे निवारण - ७६

  • शिल्लक - ४९

  • एकूण तक्रारी - ३७८

  • निवारण - २७३

  • शिल्लक - १०५

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in