Mumbai : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कायम; २५ हजारांवर कुत्र्यांचे निर्बीजीकरण; तरीही त्रास सुरूच

मुंबईतील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी निर्बीजीकरणावर भर देण्यात आला आहे. जानेवारी २०२५ ते जानेवारी २०२६ पर्यंत तब्बल २५ हजार ९८० भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या देवनार पशुवधगृहाकडून देण्यात आली.
Mumbai : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कायम; २५ हजारांवर कुत्र्यांचे निर्बीजीकरण; तरीही त्रास सुरूच
Mumbai : भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कायम; २५ हजारांवर कुत्र्यांचे निर्बीजीकरण; तरीही त्रास सुरूच
Published on

मुंबई : मुंबईतील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी निर्बीजीकरणावर भर देण्यात आला आहे. जानेवारी २०२५ ते जानेवारी २०२६ पर्यंत तब्बल २५ हजार ९८० भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या देवनार पशुवधगृहाकडून देण्यात आली. दरम्यान, भटक्या कुत्र्यांसह मांजराचे निर्बीजीकरण करण्यात आले असून वर्षभरात ११ हजार ७२५ मांजराचे निर्बीजीकरण करण्यात आल्याचे विभागाने सांगितले.

मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मुंबईत ९५ हजार भटके कुत्रे आहेत. गेल्या काही वर्षांत भटक्या कुत्र्यांनी मुंबईकरांचा चावा घेतला असून अनेकांच्या जीवावर बेतले आहे. मुंबई शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यापैकी एक म्हणजे भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण. मुंबईतील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेंतर्गत वर्षभरात २५ हजार ९८० भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. भटक्या कुत्र्यांसह मांजराचाही उपद्रव वाढला असून मांजरांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी वर्षभरात ११ हजार ७२५ मांजराचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे.

रेबीजमुळे ३६ टक्के मृत्यू भारतात

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कुत्रा चावल्यानंतरच्या वैद्यकीय उपचारांबाबत सामान्यांमध्ये खूप कमी प्रमाणात जनजागृती आहे. यामुळेच जगभरात दरवर्षी हजारो लोकांना रेबीजमुळे आपले प्राण गमवावे लागतात. रेबीजमुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूपैकी ३६ टक्के मृत्यू एकट्या भारतात होतात. आशिया आणि अफ्रिकेत रेबीजचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे.

खाद्य घालण्यासाठी १८ अधिकृत ठिकाणे

भटक्या कुत्र्यांना ठराविक ठिकाणी अन्न देण्यासाठी शहरात १८ अधिकृत फिडिंग स्पॉट्स निश्चित करण्यात आले आहेत. या ठिकाणी प्राणीप्रेमींना नियमानुसार कुत्र्यांना अन्न देण्याची परवानगी दिली जाते. यामुळे रस्त्यावर अन्न टाकणे टाळले जाते आणि परिसरातील स्वच्छताही राखली जाते.

logo
marathi.freepressjournal.in