सायंस, आर्ट्स की कॉमर्स? ११ वीसाठी मुंबईतील विद्यार्थ्यांची कोणत्या शाखेला पसंती? प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी ऑनलाईन प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. अकरावी प्रवेशासाठी एकूण २ लाख ३८ हजार ९३४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी ऑनलाईन प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. अकरावी प्रवेशासाठी एकूण २ लाख ३८ हजार ९३४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

वाणिज्य शाखेला सर्वाधिक पसंती

विद्यार्थ्यांचे सर्वाधिक अर्ज वाणिज्य शाखेसाठी आले आहेत. तब्बल १ लाख २३ हजार ७७४ विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेला पसंती दिली आहे. त्यातुलनेत केवळ २० हजार ४२९ विद्यार्थांनी कला शाखेसाठी अर्ज केला आहे.

अकरावी प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी मंगळवारी सकाळी जाहीर करण्यात आली. ही यादी विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी १५ जून रोजीपर्यंत आपल्या प्रवेशाचा भाग २ पूर्ण भरून लॉक केला आहे, अशा विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या संकेतस्थळावर लॉगिन ऑप्शनमध्ये जाऊन आपली प्रवेशाची स्थिती तपासून घ्यावी, असे आवाहन विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई कार्यालयाने केले आहे. विद्यार्थ्यांला सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये काही तक्रार असल्यास विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिनमध्ये १८ ते २१ जून या कालावधीत ग्रीव्हन्स टूलमध्ये ऑनलाईन तक्रार नोंदवावी, असे आवाहनही केले आहे.

शाखानिहाय विद्यार्थी

शाखा विद्यार्थी संख्या

कला २०४२९

वाणिज्य १२३७७५

विज्ञान ९३८९५

एचएसव्हीसी ८३६

टक्केवारी विद्यार्थी संख्या

१०० टक्के ९

९९ ते ९९.९९ टक्के ५४

९५ ते ९८.९९ टक्के ३७१५

९० ते ९४.९९ टक्के १४०३४

८० ते ८९.९९ टक्के ४७२६४

८० ते ८९.९९ टक्के ११२२८७३

५९.९९ ते त्यापेक्षा खालील ६०९८५

logo
marathi.freepressjournal.in